फेम ‘शाका लाका बूम बूम’ मधील अभिनेत्रीने वयात येण्याआधीच बोल्ड दिसण्यासाठी घेतलं इंजेक्शन?, तिनेच केला खुलासा!

काही अभिनेत्री सौंदर्य आणखी खुलून दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय केलेले दिसले आहेत. यामध्ये प्लास्टिक सर्जरी करताना दिसतात. तर आता एक अशी अभिनेत्री चर्चेत आली आहे जिने वयात येण्याआधी सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी इंजेक्शन घेतल्याचं म्हटलं जातंय.

फेम 'शाका लाका बूम बूम' मधील अभिनेत्रीने वयात येण्याआधीच बोल्ड दिसण्यासाठी घेतलं इंजेक्शन?, तिनेच केला खुलासा!
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 8:46 PM

मुंबई : बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्री ही सुंदर आहेच. अभिनयासोबतच अभिनेत्रींची त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा कायम होत असते. काही अभिनेत्री सौंदर्य आणखी खुलून दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय केलेले दिसले आहेत. यामध्ये प्लास्टिक सर्जरी करताना दिसतात. तर आता एक अशी अभिनेत्री चर्चेत आली आहे जिने वयात येण्याआधी सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी इंजेक्शन घेतल्याचं म्हटलं जातंय.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून अभिनेत्री हंसिका मोटवानी आहे. हंसिका मोटवानीनं अगदी कमी वयात सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिला शाका लाका बूम बूम या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर हंसिकानं अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण एकेकाळी हंसिकाबाबत एक अफवा सगळीकडे पसरली होती. असं म्हटलं जात होतं की तिनं वयात येण्यापूर्वीच तरुण दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन घेतलं होतं. पण, एका मुलाखतीत हंसिकानं स्पष्टीकरण देत या अफवांना पूर्णविराम लावला आहे.

हंसिकानं तिच्या आईसोबत बॉलिवूड बबलला मुलाखत दिली होती. यावेळी हंसिकानं तिच्या आयुष्यात बाबत आणि इंजेक्शनच्या अफवांवर भाष्य केलं. सोबतच तिच्या आईनेही या अफवांवर स्पष्टीकरण देत संताप व्यक्त केला. सुरुवातीला आम्हाला खूप वाईट वाटायचं पण तरी आम्ही गप्प बसायचो. कोणतं हे इंजेक्शन, मलाही सांगा मग मी टाटा-बिर्ला पेक्षा श्रीमंत होईल. मग मी ते इंजेक्शन सर्वांना देते आणि पैसे कमावते. कोणती आई असं करेल? किंवा असं कोणतं इंजेक्शन आहे जे तुम्हाला तरूण बनवेल? असं हंसिकाच्या आईनं म्हटलं होतं.

हंसिकाने सांगितली तिची कमजोरी

मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. त्यामुळे मी आजारी असल्यावरही इंजेक्शन कधी लावून घेत नाही. तसंच मी त्या भीतीमुळे टॅटूही कधी बनवून घेतला नाही. त्यामुळे हे हार्मोनल इंजेक्शन मी घेणं कधीच शक्य नाही, असं हंसिकानं मुलाखतीत सांगितलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.