मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत जे राजघराण्यातील आहेत. अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) ही त्यापैकीच एक. अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबादच्या राजघराण्यात झाला. अदिती आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आदितीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत…
आदिती ही राजा-महाराजांच्या घराण्यातील आहे. अदितीचे पणजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे प्रधानमंत्री होते. याशिवाय आदिती ही मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची भाची आहे. जे आसामचे माजी राज्यपाल राहिले आहेत. अदितीचे आजोबा, राजा जे. रामेश्वर राव यांनी तेलंगणातील वानापर्थीवर राज्य केले आणि हैदराबादचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ शांता रामेश्वर राव ओरिएंट ब्लॅकस्वन पब्लिशिंग हाऊसचे अध्यक्ष होते.
आदितीने तिचे शालेय शिक्षण आंध्र प्रदेशातील लेडी श्रीराम कॉलेजमधून केले. एका मुलाखतीत अदितीने सांगितले होते की, तिच्या आई-वडिलांनी प्रेमविवाह केला होता. पण ती दोन वर्षांची असताना दोघे वेगळे झाले. त्यानंतर ती आईसोबत दिल्लीला आली. आदितीची आई ठुमरी गायिका होती. घटस्फोटानंतर अदितीच्या वडिलांना तिचा ताबा हवा होता, पण अदितीने कधीच आईला सोडले नाही. अदिती ही एक उत्तम अभिनेत्रीसह एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. ती सुप्रसिद्ध नृत्यांगना लीला सॅमसन यांची शिष्या आहे.
आदितीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने 2006 मध्ये मल्याळम चित्रपट ‘प्रजापती’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. आदितीचा पहिला हिंदी चित्रपट ‘दिल्ली 6’ होता. या चित्रपटानंतर आदितीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. आदितीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना दाखवून दिले आहे की, ती मोठ्या स्टार्सलाही टक्कर देऊ शकते. आदितीच्या हिट चित्रपटांमध्ये ‘रॉकस्टार’, ‘मर्डर 3’, ‘फितूर’ आणि ‘पद्मावत’ यांचा समावेश आहे.
अदितीचे वैयक्तिक आयुष्य खूप गोपनीय होते, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. आदितीने 2009 मध्ये अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. त्यावेळी आदिती अवघ्या 21 वर्षांची होती. अदिती 17 वर्षांची असताना तिची सत्यदीपशी भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2012 मध्ये त्याने आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला होता. यानंतर 2013 मध्ये त्यांनी दोघांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले.
उत्सव लेखकांचा, दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा, पडद्यामागच्या कलाकारांचा होणार सन्मान!
आलिया भट्ट-रणबीर कपूर डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार? चित्रपटांचे चित्रीकरण ढकलले पुढे!