Happy Birthday AR Rahman | पोटासाठी मिळेल ते काम करणारा तरुण ते 2 ऑस्कर पटकावणारा ‘मोझार्ट ऑफ मद्रास’, रहमान चा थक्क करणारा प्रवास!

ए. आर. रहमान (AR Rahman) नाव घेताच ‘रोजा जानेमन’, ‘छोटी सी आशा’, ‘ये हँसी वादियां’ ते ‘जय हो’ पर्यंतची सगळी गाणी लगेचच बॅकग्राऊंडला सुरु झाल्यासारखी वाटायला लागतात. त्याचं हे जादुई संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.

Happy Birthday AR Rahman | पोटासाठी मिळेल ते काम करणारा तरुण ते 2 ऑस्कर पटकावणारा 'मोझार्ट ऑफ मद्रास', रहमान चा थक्क करणारा प्रवास!
AR Rahman
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:45 AM

मुंबई : ए. आर. रहमान (AR Rahman) नाव घेताच ‘रोजा जानेमन’, ‘छोटी सी आशा’, ‘ये हँसी वादियां’ ते ‘जय हो’ पर्यंतची सगळी गाणी लगेचच बॅकग्राऊंडला सुरु झाल्यासारखी वाटायला लागतात. त्याचं हे जादुई संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. ऑस्कर मिळवणे हे जवळ-जवळ प्रत्येक भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, संगीतकारांचे स्वप्न असते. परंतु जगभरातील उत्कृष्ट कलाकारांवर मात करून ऑस्कर मिळवणे सोपे नसते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करूनही ए. आर. रहमानने ऑस्कर मिळवण्याची ही कामगिरी करून दाखवली होती.

6 जानेवारी 1967 रोजी मद्रासमध्ये जन्मलेल्या अल्लाह रक्खा रहमान अर्थात ए.आर.रहमान यांचे खरे नाव ए.एस.दिलीपकुमार मुदलीयार! त्यांचे वडिल राजगोपाल कुलशेखर हे तामिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम संगीतकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. लहानपणासूनच ते वडिलांना त्यांच्या कामात थोडी फार मदत करीत असत. पुढे त्यांनी मास्टर धनराज यांच्याकडून संगीताचे विधिवत शिक्षणही घेतले. मात्र रहमान नऊ वर्षांचे असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळेस घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना कठिण परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते.

‘नेमेसिस ॲव्हेन्यू बँड’ची स्थापना

याच दरम्यान, त्यांनी बालपणीचा मित्र शिवमणीसोबत स्टेज शोमध्ये की-बोर्ड वाजवण्याचे काम सुरु केले. पोटाची खळगी भरण्यासाठी स्टेज शो करणाऱ्या ए.आर. रहमान यांनी पुढे चेन्नईत ‘नेमेसिस ॲव्हेन्यू बँड’ची स्थापना केली. रहमान यांची बोटं की-बोर्ड, पियानो, हार्मोनियम आणि गिटार यांसारख्या वाद्यांवर अगदी सराईतपणे फिरतात. आधुनिक यंत्रांची साथ घेऊन, संगीत तयार करण्यात ते वाकबगार आहेत. बँडमध्ये काम करीत असतानाच त्यांना लंडनमधील ‘ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्यूझिक’ची स्कॉलरशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी ते लंडनला रवाना झाले. लंडनच्या या महाविद्यालयातून त्यांनी पाश्चात्य संगीताचे शिक्षण घेतले.

एका वेळी चार की-बोर्ड वाजवणारा मुलगा!

लहानपणापासूनच ए. आर. रहमान आपल्या की-बोर्डच्या कौशल्याने लोकप्रिय झाले होते. दूरदर्शनवरील ‘वंडर बलून शो’मध्ये एका वेळी चार की-बोर्ड वाजवणारा मुलगा म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. वयाच्या 11व्या वर्षीच प्रख्यात संगीतकार इलयाराजा यांच्याकडे त्यांनी की-बोर्ड वाजवण्याचे काम सुरु केले होते.

‘रोजा’द्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण

1992 मध्ये त्यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील करिअरची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आपल्या घराच्या मागच्या बाजूला त्यांनी ‘पंचथान रेकॉर्ड इन’ या नावाने स्टुडीओ तयार केला. जाहिराती आणि दूरदर्शनच्या काही कार्यक्रमांना संगीत देण्याचे काम त्यांनी सुरु केले. याच वर्षी प्रदर्शित झालेला, दिग्दर्शक मणीरत्नम यांच्या ‘रोजा’ या चित्रपटाद्वारे ए. आर. रहमान यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. तमिळ भाषेत असलेल्या या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून रहमान यांना ‘रजत कमळ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘रोजा’ चित्रपट सुपरहिट झाला आणि त्यातली गाणीही! पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘रंगीला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

‘रंगीला’नंतर ‘बॉम्बे’, ‘दिल से’, ‘ताल’, ‘तहजीब’, ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘जोधा अकबर’, ‘गजनी’, ‘तहजीब’, ‘स्लमडॉग मिलिनियर’ अशा अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये असलेली त्यांची सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. देशाच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी तयार केलेला ‘वंदे मातरम’ अल्बमही प्रचंड लोकप्रिय झाला. ए. आर. रहमान यांनी प्रभुदेवा आणि शोभनासोबत तामिळ चित्रपटातील डान्सर्सचा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपने मायकल जॅक्सनसोबत स्टेज शोमध्ये भाग घेतला होता.

हॉलीवूडमध्येही वापरले संगीत!

रहमानच्या हिंदी गाण्यांचा वापर हॉलीवुडमध्येही करण्यात आला आहे. त्यांचे संगीत असलेले ‘छैया-छैया’ गाणे हॉलीवुडच्या ‘इनसाइड मॅन’ चित्रपटात वापरण्यात आले होते, तर ‘बॉम्बे’ चित्रपटातील म्यूझिक ट्रॅक ‘डिव्हाईन इंटरवेंशन’ चित्रपटात वापरण्यात आले होते. 2013मध्ये कॅनडातील ओंटोरियो शहरातील एका रस्त्याला ए. आर. रहमानचे नाव देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ॲमेझॉनने जगातील सर्वोत्कृष्ट 100 म्युझिक अल्बमची यादी तयार केली. या यादीत ए.आर.रहमान यांनी संगीत दिलेल्या ‘लगान’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे.

दोन ऑस्कर मिळवणारे पहिले आशियाई कलाकार!

दोन ‘ऑस्कर’ मिळवणारे ए.आर.रहमान ही पहिले आशियाई कलाकार आहेत. 2009मध्ये ‘स्लमडॉग मिलिनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी त्यांना ‘बेस्ट ओरिजिनल स्कोर’ आणि ‘बेस्ट ओरिजिनल सॉंग’ या श्रेणीत ऑस्कर देण्यात आला. ‘गोल्डन ग्लोब’ या प्रतिष्ठित पुरस्कार आपले नाव कोरणारे ते पहिले भारतीय आहेत. या शिवाय 25 ‘फिल्म फेअर’ पुरस्कार, 4 राष्ट्रीय पुरस्कार, 2 ग्रॅमी आणि अकादमी पुरस्कारांसह ‘पद्मश्री’(2000), ‘पद्म विभूषण’(2010)ने त्यांना गौरवण्यात आले आहे.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.