Happy Birthday Jeetendra | शोभा कपूर नाही तर जितेंद्र यांना हेमा मालिनीशी करायचे होते लग्न, वाचा का तुटले हे नाते…

आपल्या अनोख्या अभिनय शैलीसाठी परिचित असलेल्या जितेंद्र यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे.

Happy Birthday Jeetendra | शोभा कपूर नाही तर जितेंद्र यांना हेमा मालिनीशी करायचे होते लग्न, वाचा का तुटले हे नाते...
जितेंद्र
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 1:54 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jeetendra) आज (7 मार्च) 80वा वाढदिवस साजरा करत आहे. जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला. आपल्या अनोख्या अभिनय शैलीसाठी परिचित असलेल्या जितेंद्र यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. जितेंद्र हे एक असे अभिनेते आहेत, ज्यांना त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट नर्तक म्हटले जायचे. आजही चाहते त्यांना ‘जम्पिंग जॅक’ या नावाने ओळखतात. जितेंद्र यांचे शोभा कपूर यांच्याशी लग्न झाले आहे. परंतु, शोभा नव्हे तर जितेंद्र यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते. जितेंद्र सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असले तरी त्यांची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच होत असते (Happy Birthday Jeetendra know why jeetendra and hema malini could not get married).

हेमा मालिनीशी करायचे होते लग्न!

एक काळ असा होता की धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. असे म्हणतात की त्यावेळी जितेंद्र देखील एक सुपरस्टार झाले होते. अशा परिस्थितीत हेमा मालिनीशी लग्न केले तर तेही धर्मेंद्रांसारखे लकी सुपरस्टार होतील, अशी भावना जितेंद्र यांच्या मनात आली. या कारणास्तव, जितेंद्र यांनी आपल्या आईला हेमाच्या आईला भेटायला पाठवले. पण हेमाच्या आईने मुलीच्या निर्णयासह पुढे जाणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी हेमा मालिनीला या लग्नाबद्दल विचारले.(Happy Birthday Jeetendra know why jeetendra and hema malini could not get married)

एक वेळ अशी आली होती की, या दोन्ही स्टार कुटूंबाची भेटही झाली. या दोघांचेही लग्न होणार होते, पण त्यांना साखरपुड्यानंतर लगेचच लग्न करण्याची इच्छा होती. हेमा मालिनीही या लग्नासाठी सज्ज झाल्या होत्या. मात्र, त्याच वेळी जितेंद्र यांची गर्लफ्रेंड शोभा सिप्पी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह मद्रास येथे पोहोचल्या आणि जितेंद्रचे यांचे हे लग्न मोडले. असं म्हणतात की, हेमाने स्वत: जितेंद्रशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर 1974मध्ये जितेंद्र यांनी शोभा यांच्यासोबत लग्न केले होते. तर, हेमा मालिनी यांनी देखील धमेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली.

श्रीदेवीसोबत अफेअरची चर्चा

1983 साली ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित झाला. अभिनेत्री श्रीदेवी, जितेंद्र यांच्यासह या चित्रपटात दिसली. चित्रपटात काम करण्यापूर्वीच श्रीदेवी जितेंद्रची खूप मोठी फॅन होती. या चित्रपटात श्रीदेवी कास्ट झाल्याची चर्चा शोभापर्यंतही पोहोचली होती. ज्यामुळे दोघांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत जितेंद्रने घरी बोलावून श्रीदेवीची आपल्या पत्नीशी ओळख करून दिली. हीच बैठक जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या नात्यातील अंतराला कारणीभूत ठरली.

(Happy Birthday Jeetendra know why jeetendra and hema malini could not get married)

हेही वाचा :

Video | श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोरिला! पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

PHOTO | एक फोटो, तीन सुपरस्टार आणि मोठं राजकीय स्टेटमेंट, का बॉलिवूडला झापतायत नेटीझन्स?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.