Happy Birthday Johnny Lever | रस्त्यावर पेन विकणारा 7वी पास मुलगा पुढे बॉलिवूडचा ‘कॉमेडी किंग’ बनला!

बॉलिवूडचे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांचा आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे.

Happy Birthday Johnny Lever | रस्त्यावर पेन विकणारा 7वी पास मुलगा पुढे बॉलिवूडचा ‘कॉमेडी किंग’ बनला!
जॉनी लिव्हर
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 8:36 AM

मुंबई : बॉलिवूडचे ‘कॉमेडी किंग’ अभिनेते जॉनी लिव्हर (Johnny Lever) यांचा आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी माणसामागे एक कथा असते.  त्याचप्रमाणे जॉनी लिव्हरनेही आज जे स्थान मिळवलं आहे, त्याच्या मागे एक प्रचंड मोठा संघर्ष आहे. जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे.

आंध्र प्रदेशात जन्मलेल्या, जॉनी लिव्हरचे संगोपन मुंबईच्या धारावी भागात झाले. त्यांचे वडील प्रकाश राव हिंदुस्तान लीव्हरमध्ये काम करायचे आणि आई घर सांभाळायची. प्रकाश रावांना दारू पिण्याची खूप वाईट सवय होती, ज्यामुळे घरात पैसे शिल्लक नव्हते. असे म्हटले जाते की जॉनी लिव्हर, घरची वाईट आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्रस्त, त्याने एकदा आत्महत्या करण्याचा विचार केला होता पण नंतर हेतू बदलला. जॉनी जेव्हा सातव्या वर्गात शिकत होते, तेव्हा त्यांच्या घराची आर्थिक स्थिती खालावली होती, ज्यामुळे त्यांना सातवीनंतर शिक्षण सोडावे लागले. जॉनीच्या संघर्षाची कहाणी येथूनच सुरू झाली.

मुंबईच्या रस्त्यावर विकले पेन

जॉनी लिव्हरच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली, तेव्हा त्यांनी काम करून कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. जॉनी बॉलिवूड स्टार्सची नक्कल करत मुंबईच्या गल्ल्यांमध्ये पेन विकत असत. यासोबत ते एका कलाकाराप्रमाणे नाचायचे. नंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम मिळवून दिले.

…आणि बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला!

हिंदुस्तान लिव्हरच्या कारखान्यात काम करताना जॉनी त्यांच्या मिमिक्री आणि कॉमेडीने लोकांना हसवायचे. बेबी तबस्मुने जॉनी यांना ‘तुम पर हम कुरबान’ चित्रपटात पहिला ब्रेक मिळवून दिला. तर, सुनील दत्त यांनी जॉनीला आपल्या ‘दर्द का रिश्ता’ चित्रपटात काम दिले. येथून त्यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली.

‘या’ बॉलिवूड चित्रपटांमध्ये केले काम!

‘बाजीगर’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जुदाई’, ‘येस बॉस’, ‘इश्क’, ‘आंटी नंबर 1’, ‘दुल्हे राजा’, ‘कुछ कुछ होता है’, ‘अनारी नंबर 1’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘फिर हेरा फेरी’, ‘गोलमाल 3’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘हाऊसफुल्ल 4’ सारख्या अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

1984मध्ये बांधली लग्नगाठ

जॉनीने 1984मध्ये सुजाताशी लग्न केले. जॉनीला दोन मुले आहेत, एक मुलगी जेसी आणि मुलगा जेमी जॉन लिव्हर. त्यांची दोन्ही मुलेही स्टँडअप कॉमेडियन आहेत.

हेही वाचा :

Video : मालदीवमध्ये धमाल करताना सना खान पडली पाण्यात, नवऱ्याची रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही येईल हसू

Friday Release : ‘भुज’ ते ‘शांतित क्रांती’ या वेब सीरीज आणि चित्रपटातून होणार भरभरून मनोरंजन

कंगनाचा ग्लॅमरस अवतार, नेटकऱ्यांनी करून दिली देव, देश आणि धर्माची आठवण!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.