Happy Birthday Prabhu Deva | दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमापायी मोडला 16 वर्षांचा संसार, चित्रपटाच्या सेटवर जुळले सुत, वाचा प्रभु देवाबद्दल…

भारताचा ‘मायकेल जॅक्सन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता प्रभु देवा (Prabhu Deva) आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रभु देवाचा जन्म 3 एप्रिल 1973 रोजी म्हैसूर येथे झाला.

Happy Birthday Prabhu Deva | दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या प्रेमापायी मोडला 16 वर्षांचा संसार, चित्रपटाच्या सेटवर जुळले सुत, वाचा प्रभु देवाबद्दल...
प्रभु देवा
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 10:35 AM

मुंबई : भारताचा ‘मायकेल जॅक्सन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता प्रभु देवा (Prabhu Deva) आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रभु देवाचा जन्म 3 एप्रिल 1973 रोजी म्हैसूर येथे झाला. प्रभु देवा एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच एक उत्तम नर्तक देखील आहे. त्याचे वडील एक नामांकित नर्तक होते आणि दक्षिण इंडस्ट्रीमध्ये डान्स मास्टर म्हणून काम करत होते. प्रभू देवाची प्रतिभा पाहून त्यांनी भरतनाट्यमबरोबरच आपल्या मुलाला पाश्चात्य नृत्य देखील शिकवले. त्यानंतर त्याने दक्षिण इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. नृत्य दिग्दर्शक ‘वेत्री विज्य’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शन केले. मात्र, प्रभु देवा व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले आहे (Happy Birthday Prabhu Deva love story of prabhu deva and nayanthara).

प्रभु देवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. प्रभु देवा दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबतच्या नात्यामुळे खूप चर्चेत राहिला आहे. पण, नंतर ते दोघेही वेगळे झाले. एका चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. जेव्हा नयनताराने प्रभू देवाला डेट करण्यास सुरवात केली, तेव्हा प्रभु देवा विवाहित होते आणि त्यांना 3 अपत्ये देखील होते. वृत्तानुसार, दोघेही प्रेमात इतके वेडे झाले होते की, त्यांनी एकत्र राहण्यास सुरुवात केली होती.

प्रभु देवाच्या पत्नीने गाठले कौटुंबिक न्यायालय

कोरिओग्राफरची पत्नी लता यांना जेव्हा प्रभु देवा आणि नयनतारा यांच्यातील संबंधांबद्दल समजले, तेव्हा तिने 2010मध्ये कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी प्रभु देव आणि नयनतारा एकत्र राहत होते. प्रभु देवाने नयनतारासोबत लग्न केले तर, त्या उपोषणावर बसतील, असे लता यांनी म्हटले होते. नयनताराच्या प्रेमात वेडा झालेल्या प्रभुदेवावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. 2011मध्ये त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यांचे 16 वर्षाचे लग्न मोडले (Happy Birthday Prabhu Deva love story of prabhu deva and nayanthara).

घटस्फोटानंतर ढासळली आर्थिक स्थिती

जेव्हा, प्रभु देवाने पत्नी लताला घटस्फोट दिला, त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. घटस्फोटानंतर त्यांना पत्नीला पोटगी म्हणून 10 लाख रुपये आणि अर्धी संपत्ती द्यावी लागली होती.

प्रभु देवासाठी बदललेला धर्म

मूळत: ख्रिश्चन घरात जन्मलेल्या नयनतारानेही प्रभु देवाशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला होता. 2011मध्ये तिने हिंदू धर्मात धर्म परिवर्तन केले होते. पण, नंतर दोघांमध्ये काहीच संभाषण झाले नाही आणि नयनताराने प्रभू देवाबरोबरचे तिचे सर्व संबंध संपवले. प्रभुदेवाशी संबंध तोडल्यानंतर नयनतारानेही अद्याप लग्न केले नाही.

(Happy Birthday Prabhu Deva love story of prabhu deva and nayanthara)

हेही वाचा :

Rakhi Sawant | पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार, ‘या’ व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ!

Video | भाईजानच्या ‘टायगर 3’साठी कतरिना कैफ गाळतेय जिममध्ये घाम, पाहा व्हिडीओ…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.