Honey Singh : सिद्धू मुसेवालानंतर आता हनी सिंहचा नंबर? दिल्ली पोलिसांकडे हनी सिंहची सुरक्षेची मागणी
सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये आरोपी असणारा गोल्डी बराड याने हनी सिंहला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कॅनडावरुन हनी सिंहला व्हाईस नोटद्वारे धमकी मिळाली आहे.
नवी दिल्ली : हनी सिंह म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत, हनी सिंहचे गाणे ऐकत मोठी झालेली पीढी आजही त्याची गाणी गुनगुनत असती. मागील अनेक दिवसांपासून हनी सिंह संकटांचा सामना करत आहे. मोठा ब्रेक घेतल्यानंतर, हनी सिंहने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केलंय. हनी सिंहची नुकतीच काही गाणी रिलीज झाली असून ती हिटही झालीत. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासाठी हनीने गाणी गायली आहे. अशातच आता हनी सिंहला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सिद्धू मुलेवालाच्या हत्येमध्ये आरोपी असणारा गोल्डी बराड याने हनी सिंहला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कॅनडावरुन हनी सिंहला व्हाईस नोटद्वारे धमकी मिळाली आहे. काही दिवसांआधी सलमान खानला गोल्डीने धमकी दिली होती. सलीम खान यांना धमकीचे पत्र लिहित सलमानचे सिद्धू मूसेवालासारखे हाल करणार असल्याचं त्यामध्ये म्हटलं होतं.
हनी सिंह याने घेतली पोलिसात धाव
गुंड गोल्डी बराडने व्हॉईस नोट मध्ये नेमकं काय म्हटंलय या बद्दल हनीने कोणताच खुलासा केलेला नाही. मात्र, वेळ आल्यावर तुझा काटा काढू अशी धमकी मिळाल्याचे समजते. याबाबत हनी सिंह तातडीने पोलीस आयुक्तांना भेटला असून त्याने सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. हनी सिंहने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हनी सिंह आणि त्याच्या टीमला हा धमकीचा कॉल आलेला आहे. कॉल आल्यानंतर हनी खूपच घाबरलेला आहे. त्याने धमकी बाबत कोणतीच माहिती सार्वजनिक केलेली नसून वकिलांशी बोलून झाल्यावर संपूर्ण माहिती देणार असल्याचं म्हटलं आहे.
हनी सिंह धमकीनंतर खूपच घाबरलेला आहे. माझ्या सोबत असं पहिल्यांदाच घडलंय. मला असा धमकीचा कॉल पहिल्यांदाच आलाय. मी आणि माझ्या परिवारातील लोक घाबरलो असल्याचंही हनी सिंहने सांगितलं.
लॉरेंस बिश्नोईचा खास गोल्डी
दरम्यान, गोल्डी बराड हा कॅनडामध्ये राहून भारतात अशी कामे करतो. गोल्डी सिद्धू मूसेवालाचा हत्यारा असून, त्याने सलमान खानला मारण्याची धमकी दिलेली आहे. सध्या गोल्डी फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. हनी सिंहने दिलेल्या तक्रारीत गोल्डीचं लास्ट लोकेशन कॅनडा असल्याचे समजते. गोल्डीचं खरं नाम सतविंदरजीत सिंह आहे. गोल्डी लॉरेंस बिश्नोईचा खास असून कॅनडावरुन काम पाहतो.