Renuka Shahane Falling Scene | ‘हम आपके हैं कौन’च्या दिग्दर्शकाच्या ‘या’ चातुर्यामुळे जिन्यावरुन गडगडताना रेणुका शहाणेंना अजिबात दुखापत झाली नाही

बाळाला सांभाळण्यासाठी निशाच्या हातात देऊन पूजा खोलीबाहेर जाते. फोन खालच्या मजल्यावर असतो. काहीशी धावत-पळतच पूजा जिन्यावरुन उतरायला जाते. इतक्यात मागून कसलातरी आवाज आल्याने ती वळते, आणि तिचा पाय घसरतो, असा तो सीन आहे

Renuka Shahane Falling Scene | 'हम आपके हैं कौन'च्या दिग्दर्शकाच्या 'या' चातुर्यामुळे जिन्यावरुन गडगडताना रेणुका शहाणेंना अजिबात दुखापत झाली नाही
हम आपके है कोन चित्रपटातील रेणुका शहाणे जिन्यावरुन पडतानाचे दृश्य
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 9:15 AM

मुंबई : सुरज बडजात्या (Suraj Badjatya) यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘हम आपके हैं कौन’ (Hum Aapke Hai Kaun) या सुपरहिट चित्रपटाला रिलीज होऊन नुकतीच (पाच ऑगस्ट) 27 वर्ष पूर्ण झाली. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. मात्र इतक्या वर्षांनंतरही सिनेमातील संवाद, गाणी, सीन्स अनेक चाहत्यांना आजही तोंडपाठ आहेत. चित्रपटातील अनेक लोकप्रिय दृश्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनी साकारलेल्या पूजा या व्यक्तिरेखेच्या अपघाताचा सीन.

पूजा भाभी घरातील जिन्यावरुन गडगडत खाली कोसळते आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू होतो, असा हा सीन. अत्यंत हसऱ्या-खेळकर असलेल्या सिनेमाच्या मूडला गालबोट लावणारा हा भाग होता. अगदी आया-बायांसह पुरुषांच्याही डोळ्याला या हृदयस्पर्शी सीनने धार लागली होती. मात्र हा सीन कसा शूट झाला, तो चित्रित करताना रेणुका शहाणे यांना खरंच दुखापत झाली का, हा प्रश्न वर्षानुवर्ष अनेकांच्या मनात आहे.

काय आहे सीन?

अभिनेत्री रेणुका शहाणे अर्थातच पूजा भाभी ही दीर प्रेम (सलमान खान) याच्यासोबत ‘लो चली मैं, अपनी देवर की बारात ले के’ या गाण्यावर नाचत असते. प्रेम आणि निशा (माधुरी दीक्षित) यांच्या प्रेमाचं नात्यात रुपांतर होणार असतं, या आनंदातच पूजा भाभी गाण्यावर ठेका धरते. गाण्यात उत्साही प्रेम, लाजरी बुजरी निशा, पूजाचं नुकतंच जन्मलेलं बाळ, त्यांचा कुत्रा टफी असा सगळा लवाजमा आहे.

गाण्यानंतर घरातील फोनची बेल वाजते. बाळाला सांभाळण्यासाठी निशाच्या हातात देऊन पूजा खोलीबाहेर जाते. फोन खालच्या मजल्यावर असतो. काहीशी धावत-पळतच पूजा जिन्यावरुन उतरायला जाते. इतक्यात मागून कसलातरी आवाज आल्याने ती वळते, आणि तिचा पाय घसरतो. ती किंचाळते. उंच जिन्यावरुन पूजा गडगडत थेट खाली पडते. ती खालच्या मजल्यावर पोहोचते, तेव्हा तिचे कपाळ रक्तबंबाळ झालेले असते. आवाज ऐकून प्रेम आणि निशा तिथे पोहोचतात आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेतात. पुढचा क्रम बहुतेकांना माहित असेल, किंवा तो चित्रपटात पाहणंच रंजक आहे. त्यामुळे हा सीन कसा शूट झाला, याकडे आधी वळूया.

कसा शूट झाला तो सीन?

खुद्द रेणुका शहाणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की दिसतं त्याप्रमाणे तो खरोखर लाकडी किंवा दगडी जिना नव्हता. तर तो चक्क स्पंजने लादलेला जिना होता. त्यामुळे मला अजिबात दुखापत झाली नाही. सुरज बडजात्या याबाबत अत्यंत काटेकोर आहेत. कोणालाही दुखापत होणार नाही, याची ते पुरेपूर काळजी घेतात. त्यामुळे काहीच दुखापत होत नसताना, त्या स्पंजच्या जिन्यावरुन घसरताना वेदना होत असल्याचा अभिनय करणं, माझ्यासाठी जास्त आव्हानात्मक होतं. इतकी वर्ष आपण ज्या सीनमागच्या कहाणीबद्दल उत्सुकता बाळगून होतो, त्याचं रहस्य अखेर उलगडलं म्हणायचं.

पाहा रेणुका शहाणे जिन्यावरुन गडगडतानाचे दृश्य :

संबंधित बातम्या :

एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.