50 Years Of Anand | महानायक अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट ‘आनंद’, वाचा याचे खास किस्से…

बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट 'आनंद'च्या (Anand) रिलीजला आज (12 मार्च) 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 12 मार्च 1971 रोजी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

50 Years Of Anand | महानायक अमिताभ बच्चन यांना ओळख मिळवून देणारा चित्रपट ‘आनंद’, वाचा याचे खास किस्से...
आनंद
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 3:43 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘आनंद’च्या (Anand) रिलीजला आज (12 मार्च) 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट 12 मार्च 1971 रोजी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. हा एक अत्यंत भावनिक चित्रपट होता, जो आजपर्यंत चाहते विसरलेले नाहीत. या चित्रपटाची कथा, संवाद, गाणी आणि अभिनय आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी राजेश खन्ना एक सुपरस्टार होते आणि चित्रपटात केवळ त्यांची उपस्थिती असणे म्हणजे तो चित्रपट हिट होणार, असे मानले जात असे. या चित्रपटाच्या वेळी अमिताभ मनोरंजन विश्वात पूर्णपणे नवखे होते (Indian Cinema 50 years of super hit movie anand know some interesting stories of this film).

तरीही हृषीकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’ हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या हाती आला. असं म्हणतात की, अमिताभ बच्चन यांना या चित्रपटाने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली होती. कर्करोगाच्या रूग्णावर आधारित हा चित्रपट पाहिल्यानंतर किती लोक थिएटरमध्येच रडले होते. चला तर, आज या चित्रपटाशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया…

अमिताभ यांना प्रथमच लोकांनी ओळखले!

स्वत: अमिताभने एकदा सांगितले होते की, ज्या दिवशी आनंद हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी अमिताभने आपली गाडी एसव्ही रोड, मुंबई येथे पेट्रोल पंपावर थांबवली, जिथे त्यांनी गाडीमध्ये पेट्रोल भरले. त्या वेळी, काही लोकांनी त्याला प्रथमच अभिनेता म्हणून ओळखले होते. त्याच दिवशी संध्याकाळी ते पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर पोहोचले, तेव्हा त्यांना ओळखणार्‍या लोकांची गर्दी खूप वाढली होती.

रात्रभर जागले होते हृषीकेश मुखर्जी

हृषीकेश मुखर्जी यांनी प्रथम धर्मेंद्रला चित्रपटाची कहाणी ऐकवली होती. त्यांनीही हा चित्रपट करण्यास सहमती दर्शवली होती. पण, त्यानंतर अचानक काही दिवसांत अशी बातमी आली की, आनंदमध्ये राजेश खन्ना मुख्य भूमिकेत दिसतील. असे म्हटले जाते की यानंतर, धर्मेंद्रने एकदा रात्री हृषीकेश दांना फोन केला आणि म्हणाले की, तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? दिग्दर्शकाच्या भरपूर समजवण्यानंतरही धर्मेंद्र यांनी काहीच ऐकले नव्हते आणि त्यांनी हृषीकेश दांना रात्री झोपू दिले नव्हते (Indian Cinema 50 years of super hit movie anand know some interesting stories of this film).

राजेश खन्ना यांनी आकारले कमी मानधन!

असे म्हणतात की. त्यावेळी राजेश खन्ना प्रत्येक चित्रपटासाठी 8 लाख फी आकारत असत. पण जेव्हा हा चित्रपट अनेक कलाकारांच्या हातातून निघून गेला आहे, हे कळताच त्यांनी हृषीकेश दा यांच्याकडे जाऊन सांगितले की, मी चित्रपट करण्यास तयार आहे. पण, आधीच्या काही गोष्टी लक्षात घेऊन दिग्दर्शकाने राजेश खन्ना यांच्यासमोर तीन अटी ठेवल्या, पहिली म्हणजे वेळेवर येण्याची, दुसरी – अधिक तारखा देण्याची आणि तिसरे अट अशी होती की, या चित्रपटासाठी त्यांना केवळ 1 लाख रुपये मानधन म्हणून मिळेल. राजेश खन्ना यांनी काहीच न बोलता त्यांच्या सर्व अटी सहज मान्य केल्या होत्या.

राज कपूर यांचा चित्रपटाशी खास संबंध

आनंद या चित्रपटामध्ये राजेश खन्ना म्हणजेच आनंद सहगल आपले प्रिय मित्र डॉ. भास्कर बॅनर्जी अर्थात अमिताभ बच्चन यांना ‘बाबू मोशाय’ म्हणून संबोधत. असे म्हणतात की, हा शब्द राज कपूर यांनी दिला होता. राज कपूर हृषीकेश दा यांना ‘बाबू मोशाय’ म्हणायचे.

(Indian Cinema 50 years of super hit movie anand know some interesting stories of this film)

हेही वाचा :

Alia Bhatt | ‘पॅशनेट अबाऊट वर्क’, कोरोना चाचणी निगेटिव्ह येताच कामावर परतली आलिया भट्ट!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.