Inspiring Love Stories | 15 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नावर जडले डिंपल कपाडियांचे प्रेम, अनेक संकटांवर मात करत अमर झाली प्रेमकथा!

प्रेम करणे सोपे आहे, परंतु ते टिकवणे तितकेच कठीण आहे. प्रेमात एकमेकांवर विश्वास ठेवणे, पाठिंबा देणे आणि एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे आहे. प्रेमाच्या अश्याच कथांमध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या जोडीचं नाव अग्रक्रमांकावर आहे.

Inspiring Love Stories | 15 वर्षांनी मोठ्या राजेश खन्नावर जडले डिंपल कपाडियांचे प्रेम, अनेक संकटांवर मात करत अमर झाली प्रेमकथा!
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 9:14 AM

मुंबई : प्रेम करणे सोपे आहे, परंतु ते टिकवणे तितकेच कठीण आहे. प्रेमात एकमेकांवर विश्वास ठेवणे, पाठिंबा देणे आणि एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे आहे. प्रेमाच्या अश्याच कथांमध्ये सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) या जोडीचं नाव अग्रक्रमांकावर आहे. राजेश खन्ना आणि डिंपलची प्रेमकथा खूपच रंजक आहे. दोघांच्या प्रेमात अनेक अडचणी होत्या, परंतु शेवटी दोघांनी हे सिद्ध केले की, जर प्रेम खरे असेल तर वेगळे झाल्यावरही आपण आपल्या प्रेमाकडे परत जाऊ शकतो (Inspiring Love Stories Super star Rajesh Khanna and Dimple Kapadia love story).

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या लाखो चाहत्या होत्या. डिंपल कपाडिया यादेखील त्यांपैकीच एक होत्या. डिंपल आणि राजेश यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. डिंपलने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 13व्या वर्षी ‘बॉबी’ या चित्रपटाद्वारे केली होती. अगदी लहान वयातच डिंपलने आपल्या मोहक आणि बोल्ड शैलीने चाहत्यांची मने जिंकली होती.

डिंपलच नव्हे तर, राजेश खन्ना देखील डिंपलच्या प्रेमात वेडे झाले होते. राजेश खन्ना यांनी देखील वेळ न घालवता डिंपलला लग्नासाठी प्रपोज केले. डिंपलनेही त्यांना लगेच हो म्हटले. यानंतर दोघांनीही लवकरच लग्नाची तयारी देखील केली.

फिल्म इंडस्ट्रीलाही बसला धक्का!

डिंपल आणि राजेश खन्नाच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वच चकित झाले होते. सर्वत्र दोघांच्या लग्नाची चर्चा होती. राजेश खन्ना एका 15 वर्षाच्या मुलीशी स्वत:हून लग्न करत आहेत, यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. त्यांचे लग्न झाले तेव्हा डिंपल केवळ 16 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर डिंपलने चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले. त्यानंतर त्यांनी आपल्या विवाहित जीवनाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.

हनीमून आणि डिंपलचा वाढदिवस बनला खास

राजेश आणि डिंपल लग्नानंतर हनीमूनसाठी युरोपला गेले होते. या दरम्यान, राजेशने डिंपलच्या 16व्या वाढदिवसासाठी भव्य पार्टी दिली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि जया बच्चनही त्यांच्या हनीमूनसाठी लंडनला गेले होते, त्यानंतर राजेश खन्ना यांनी त्यांनाही या पार्टीमध्ये आमंत्रित केले होते (Inspiring Love Stories Super star Rajesh Khanna and Dimple Kapadia love story).

वाद सुरू झाले

काही वर्षांनी त्यांच्या प्रेमात वादाला सुरुवात झाली. या दोघांनी ज्या पद्धतीने लग्न करून चाहत्यांना चकित केले, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याचे वृत्त ऐकून देखील चाहते आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, राजेश यांच्या कारकिर्दीचा आलेखही हळू हळू खाली यायला लागला. कुठेतरी त्याचा परिणाम दोघांच्या वैवाहिक जीवनातही होऊ लागला. कारण मीडिया रिपोर्टनुसार राजेश यांचा स्वभाव थोडासा रागीट होता. तथापि डिंपल नेहमीच त्यांच्याबरोबर होती. राजेश यांच्या प्रत्येक कठीण काळात डिंपलने त्यांना पाठिंबा दर्शवला.

राजेश आणि डिंपल यांचे अमर प्रेम

दोघेही विभक्त झाले असले तरी, त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. दोघेही बराच वेळ एकत्र घालवायचे, बऱ्याच ठिकाणी एकत्र जात होते  आणि राजेश यांच्या राजकीय मेळाव्यात देखील डिंपल राजेशबरोबर असायच्या. इतकेच नाही तर, शेवटच्या दिवसांतही डिंपल नेहमीच राजेशबरोबर होती. त्यांनी राजेश यांची संपूर्ण काळजी घेतली. विभक्त झाल्यानंतरही डिंपलने पत्नी धर्माचा पाठपुरावा केला. त्याचवेळी राजेश एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘तुम्हाला माहित आहे का, मी अजूनही डिंपलवर खूप प्रेम करतो.’

(Inspiring Love Stories Super star Rajesh Khanna and Dimple Kapadia love story)

हेही वाचा :

मोठमोठे कलाकार सोडून टेनिसपटूवर बसले लाराचे प्रेम, वाचा या फिल्मी प्रेमकथेबद्दल…

विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली म्हणून सोनू सूदने चालवली सायकल, कोरोनाचे नियम विसरल्याने झाला ट्रोल!

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.