Irrfan Khan Death Anniversary : माध्यमांच्या कॅमेरापासून दूर, मृत्यूपूर्वी इरफान खानने ‘या’ प्रकारे केलेली कोरोनाग्रस्तांची मदत!

बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांच्या निधनाला आज (29 एप्रिल) एक वर्ष पूर्ण होत आहे. आज इरफानची पुण्यतिथी (Death Anniversary) आहे.

Irrfan Khan Death Anniversary : माध्यमांच्या कॅमेरापासून दूर, मृत्यूपूर्वी इरफान खानने ‘या’ प्रकारे केलेली कोरोनाग्रस्तांची मदत!
‘तुम मेरी दुनिया छीनोगे, मैं तुम्‍हारी दुनिया में घुस जाऊंगा.’ मदारी चित्रपटातील हा डायलॉग इरफान खान यांचा फेमस डायलॉग आहे.
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 11:14 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांच्या निधनाला आज (29 एप्रिल) एक वर्ष पूर्ण होत आहे. आज इरफानची पुण्यतिथी (Death Anniversary) आहे. इरफानने जरी या जगाचा निरोप घेतलेला असला, तरी आजही त्याच्या आठवणी फक्त त्यांच्या कुटुंबातच नाही, तर चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. इरफान त्यालोकांपैकी एक आहेत, जे कधीचे कशाचा दिखावा करत नव्हते. इरफानच्या मृत्यूसमयी देश कोरोना विषाणूच्या महामारीशी संघर्ष करत होता. आजारी असूनही इरफानने त्यावेळी कोरोनाग्रस्त झालेल्या लोकांची मदत केली होती. इरफानच्या जाण्यानंतर त्याचा मित्र जियाउल्लाह यांनी याबद्दल सांगितले (Irrfan Khan Death Anniversary Actor helps corona patients before his death).

त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, गेल्यावर्षी ते कोरोना ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी निधी गोळा करत होते आणि जेव्हा इरफानला हे कळले तेव्हा, ते स्वत: मदतीसाठी पुढे आले. तथापि, दरम्यान त्यांनी आपल्या मित्रासमोर एक अट ठेवली होती. इरफान म्हणाले की, याबद्दल कोणालाही काहीही सांगायचे नाही. इरफानचा असा विश्वास होता की, आपण डाव्या हाताने काही केले तर त्याची माहिती उजव्या हाताला देखील होऊ नये. इरफानने स्वतः आजारी असताना देखील गरजू लोकांना मदत केली होती.

इरफानच्या मित्रानेही सांगितले होते की, आपण याबद्दल कोणालाही काही सांगितले नव्हते. परंतु, आता जेव्हा इरफान आपल्यातून निघून गेला, तेव्हा प्रत्येकाला त्याच्या उदात्त कृत्याबद्दल आणि उदात्त विचारांबद्दल माहित असले पाहिजे. इरफान इतका मोठा स्टार होता, परंतु याचा त्यांनी कधीही अभिमान मिरवला नाही, असे जियाउल्लाहने सांगितले. तो अगदी साधा माणूस होता आणि जेव्हा जेव्हा जयपूरला त्याच्या घरी जायचा तेव्हा तो सामान्य माणसाप्रमाणे सगळ्यांना भेटायचा. कोणालाही मदतीची आवश्यकता असल्यास तो नेहमी पुढे होता(Irrfan Khan Death Anniversary Actor helps corona patients before his death).

आधीच होती मृत्यूची कल्पना

नुकतेच इरफानचा मुलगा बाबिल यांनी सांगितले की, इरफानला आधीच समजले होते की, आता ते हे जग सोडून जाणार आहेत. ते रुग्णालयात असताना मृत्यूच्या 2-3दिवस आधी बाबिल इरफानला भेटायला गेला होता. बाबिल म्हणाला, ‘पप्पा माझ्याकडे पहात होते आणि हसत म्हणाले, आता मी मरणार आहे. मात्र, मी त्यांना सांगितले की, असे काहीही होणार नाही, परंतु ते पुन्हा हसले आणि झोपी गेले.’ त्याच्या 2-3 दिवसानंतर अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला.

आजही इरफान घरी असल्यासारखे वाटते!

सुतापाने अलीकडेच एका मुलाखती दरम्यान सांगितले की, इरफान घरात सुगंधासारखा दरवळतो. तो आमच्या घरात आजही जिवंत आहे आणि जर कोणी घरात आले तर त्यांना कळतही नाही की इरफान आता या जगात नाही.

(Irrfan Khan Death Anniversary Actor helps corona patients before his death)

हेही वाचा :

Divorce Paper | कपूर घरण्याला नवं टेन्शन! नेमकी कुठे ठेवलीयत राजीव कपूरच्या घटस्फोटाची कागदपत्र?

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडून कौतुक, सोबत काम करण्याचीही ऑफर; जाणून घ्या ‘या’ गायकाचा किस्सा!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.