कतरिना कैफ खरंच प्रेग्नंट? चर्चांवर एजन्सीकडून स्पष्टीकरण
Raindrop Media Statement on Katrina Kaif Pregnancy News : कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा होत आहे. कतरिना आणि विकीचा लंडनमधील एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हापासून चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर कतरिनाच्या टीमकडून आता स्पष्टीकरण देण्यात आलंय.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचा चर्चा होत आहेत. कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांचा लंडनमधील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हीडिओत कतरिना कैफ शांतपणे लंडनच्या रस्त्यांवरून चालताना दिसत आहे. तिच्यासोबत विकीदेखील आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कतरिना देखील आई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं असतानाच तिचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या एजन्सीने या चर्चांना फेटाळलं आहे. “सर्व माध्यमांना विनंती करण्यात येते की तातडीने या चर्चा थांबवाव्यात”, असं ‘रेनड्रॉप मीडिया’ने स्पष्ट केलंय.
कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा
लंडनच्या रस्त्यावर कतरिना आणि विकी एकमेकांच्या हातात हात घालून निवांत फिरताना दिसले. कतरिना आणि विकी यांचा लंडनमधील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् कतरिनाच्या गरोदरपणाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. कतरिनाच्या चालण्यावरून नेटकऱ्यांनी अंदाज लावला की ती प्रेग्नंट असू शकते. या व्हीडीओमध्ये कतरिनाने जाडसर जॅकेट घातलं आहे. शिवाय हा व्हीडिओ लांबून शूट करण्यात आला आहे. त्यामुळे तिचं पोट या व्हीडिओत दिसत नाहीये.
View this post on Instagram
‘त्या’ बातमीने कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चांना दुजोरा
कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चा होत असतानाच ‘झूम’ या वेबसाइटने एक वृत्त दिलं. यात त्यांनी कतरिनाच्या प्रेगन्सीच्या बातम्यांना दुजोरा दिला. कतरिना प्रेग्नंट असून ती लंडनमध्ये पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. जर सर्वकाही व्यवस्थित घडलं तर कतरिना आणि विकी हे त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत युकेमध्येच करू शकतात, अशी बातमी ‘झूम’ या वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे. मात्र आता कतरिनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एजन्सीने या वृत्तावर स्पष्टीकरण दिलं आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर 2021 ला राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके पाहुणे उपस्थित होते. त्यानंतर आता लग्नाच्या अडीच वर्षांनंतर कतरिना बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.