Income Tax Raid | हॉटेल बदललं, मात्र अनुराग-तापसीची चौकशी सुरूच! आयकर विभागाची टीमही हजर

आयकर भागाकडून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची चौकाशी अद्याप सुरूच आहे. पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमधून या दोघांना आता पिंपरी चिंचवडमधील एका पंतरांकित हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.

Income Tax Raid | हॉटेल बदललं, मात्र अनुराग-तापसीची चौकशी सुरूच! आयकर विभागाची टीमही हजर
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 5:03 PM

मुंबई : आयकर भागाकडून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची चौकाशी अद्याप सुरूच आहे. पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमधून या दोघांना आता पिंपरी चिंचवडमधील एका पंतरांकित हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. तिथेही इन्कमटॅक्स विभागाने चौकशीचे सत्र सुरूच ठेवले आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, अनुराग कश्यप, तापसी आणि इन्कमटॅक्स विभागाची टीम इथे कधीपासून आहेत आणि कधीपर्यंत असतील, याबाबत हॉटेल व्यवस्थापन कोणतीच माहिती द्यायला तयार नाही (IT Raids on Bollywood taapsee pannu and anurag kashyap inquiry day 3 update).

इन्कम टॅक्स विभागाने बुधवारी (3 मार्च) मुंबई-पुण्यातील तब्बल 30 ठिकाणी छाप टाकली होती. यात अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरु असून त्यांनी कित्येक कोटींचा कर बुडवल्याचे बोलले जात आहे. गेले दोन दिवस अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे पुण्यातील वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होते. त्यांच्यासोबत आयकर विभागाची टीमदेखील याच हॉटेलमध्ये होती.

अनेक अफरातफरी, कोटींचा कर चुकवण्याचा संशय

दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्याची निगडित असलेल्या एकूण 28 मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाला त्यांच्या आर्थिक व्यवहरात काही विसंगती आढळल्याचे सांगण्यात येत आहे. आयकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे सर्च ऑपरेशन केलं. अनुराग आणि तापसीचं घर आणि ऑफिसेस मिळून तब्बल 28 ठिकाणी छापे टाकले गेले. सर्च ऑपरेशन दरम्यान इनकम आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. इनकम टॅक्स विभागाला 350 कोटी रुपयांची टॅक्स चोरीची शंका आहे. तसेच तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची रिसिट रिकव्हर झाली. ज्याची तपासणी सुरु आहे. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत (IT Raids on Bollywood taapsee pannu and anurag kashyap inquiry day 3 update).

जितेंद्र आव्हाड यांचे मोठे विधान!

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि इतर लोकांवर पडलेल्या आयकर धाडीसंदर्भात बोलताना सांगितले की, हे छापे त्याच लोकांवर टाकले जात आहेत. ज्यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न पडत होते. जे लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच लोकांवर निवडकपणे हे छापे टाकले जात आहे. कर चुकवणे ही केवळ एक सबब आहे.

कंगनाची टीका

तापसी आणि अनुराग यांच्यावर टीका केली होती. कंगनाने ट्विटद्वारे त्यांच्यावर झालेल्या इन्कमटॅक्स कारवाईबद्दल अधिकृत निवेदन दिले असून, त्यांना ‘चोर-चोर मौसरे भाई’ असेही संबोधले होते. हे लोक तुकडे-तुकडे गँगचे समर्थक असल्याचे म्हणत कंगनाने लिहिले की, “जे चोर आहेत ते फक्त चोरच असतात, ज्यांना मातृभूमीचे तुकडे करून ते विकायचे आहेत, ते हे लोक फक्त देशद्रोही आहेत. आणि देशद्रोह्यांना पाठिंबा देणारेही चोर आहेत… कारण चोर-चोर भाऊबंद असतात आणि ज्यांना हे चोर आता घाबरले आहेत, ते कोणी सामान्य माणूस नसून नरेंद्र मोदी आहेत.’

(IT Raids on Bollywood taapsee pannu and anurag kashyap inquiry day 3 update)

हेही वाचा :

Income Tax Raid | ‘हे तर छोटे प्लेयर…’, इन्कमटॅक्स धाडीनंतर कंगनाचा अनुराग-तापसीवर हल्लाबोल!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.