JGM : ‘जेजीएम’ चित्रपटाचं शूटिंग सुरू, पूजा हेगडे आणि विजय देवरकोंडांनी व्हिडीओ केला शेअर
या चित्रपटाचे शूटिंग अनेक आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर होणार असेल तरी त्याची सुरुवात मुंबईतून करण्यात आली आहे.
लवकरच तुमच्या भेटीला एक नवा चित्रपट येतोय. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा बहुचर्चित जेजीएम (JGM) चित्रपटासंदर्भातील एक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग आता सुरू झालंय. खुद्द विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीचा एक छोटासा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये शूटिंगसाठी कॅमेरे लाईट लावण्यात येत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर पूजा हेगडे सेटवर प्रवेश करतात. मग एकापाठोपाठ एक सगळेजण म्हणतात की, पूजा हेगडेंचं स्वागत आहे. मग एक एक करून चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं, असं सांगतात.
विजय देवरकोंडा यांनी व्हिडीओ शेअर केलाय
चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शूटची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी पूजा हेगडे आणि विजय देवरकोंडा यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलंय. या चित्रपटाचे शूटिंग अनेक ठिकाणी होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे वर्णन करताना, विजयने ट्विटरवर त्याचा छोटा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, ‘चला जाऊया,,JGM’
Lets gooo ?#JGM pic.twitter.com/rZ1issMwEa
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) June 4, 2022
पूजा हेगडे चित्रपटासाठी खूप उत्सुक
हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री पूजा हेगडेने ट्विटरवर कॅप्शनही लिहिलंय. त्यामध्ये पॉवर पॅक्ड आणि हाऊ, यासाठी मी खूप उत्सुक आहे. असं म्हटलंय. जेजीएमचे शूटिंग सुरू झाले आहे. विजय देवरकोंडा लवकरच सेटवर भेटू. हा चित्रपट 3 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.
Power packed and how!! ????? Super excited for this one. JGM SHOOT BEGINS ? ❤️@TheDeverakonda – see you on set soon! #PuriJagannadh #JGM ??
WW Release on AUG 3rd 2023@Charmmeofficial @directorvamshi @PuriConnects #SrikaraStudios @IamVishuReddy pic.twitter.com/1yLkGqiNdd
— Pooja Hegde (@hegdepooja) June 4, 2022
3 ऑगस्टला चित्रपट येणार
या चित्रपटाचे शूटिंग अनेक आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर होणार असेल तरी त्याची सुरुवात मुंबईतून करण्यात आली आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. जेजीएम हा पॅन इंडिया चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की विजय देवराकोंडा आणि पूजा हेगडे यांचा जेजीएम म्हमजेच जन गण मन हा चित्रपट तामिळ तेलगू, हिंदू,कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 3 ऑगस्ट 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.