Kangana Ranaut | कंगना रनौतचं देवदर्शन, परिवारासमवेत पोहचली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात! पाहा फोटो..
गेल्या काही दिवसांपासून मनाली येथे आपल्या कुटूंबियांसमवेत वेळ घालवत असलेली कंगना रनौत थेट सुवर्ण मंदिरात (Golden Temple) पोहोचली आहे. या दरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. कंगना प्रत्येक विषयावर आपले मत देण्यास मागेपुढे पाहत नाही. ज्यामुळे ती बर्याचदा वादाच्या घेऱ्यात अडकते. गेल्या काही दिवसांपासून मनाली येथे आपल्या कुटूंबियांसमवेत वेळ घालवत असलेली कंगना रनौत थेट सुवर्ण मंदिरात (Golden Temple) पोहोचली आहे. या दरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Kangana Ranaut and her family visited golden temple Amritsar).
कंगनाने आपल्या कुटुंबियांसह सुवर्ण मंदिरात दर्शन घेत असल्याची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले, ‘आज मी श्री हरमंदिर साहिब सुवर्ण मंदिरात गेले होते. मी लहानपणापासूनच उत्तरेत वाढली आहे आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने बर्याच वेळा सुवर्ण मंदिरात भेट दिली आहे. पण मी मात्र पहिल्यांदाच येथे गेले. सुवर्ण मंदिराचे सौंदर्य आणि देवत्व पाहून मी स्तब्ध झाले आहे.’
पाहा कंगनाची पोस्ट
View this post on Instagram
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही बरेच फोटो शेअर केले आहेत. हजारो लोकांना तिची ही छायाचित्रे आवडली आहेत. तिच्या चाहत्यांना या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तिचे चाहते या पोस्टवर कमेंट देखील करत आहेत. त्याच वेळी एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘कुणास ठाऊक गुरु दर्शन घेतल्यावर कंगनाला सद्बुद्धी येईल..’(Kangana Ranaut and her family visited golden temple Amritsar)
शीखांची मने जिंकण्याचा प्रयत्न?
तर, दुसरीकडे कंगना रनौत आता शीखांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असे देखील म्हटले जात आहे. शेतकरी चळवळी दरम्यान कंगना आणि पंजाबी गायक दिलजित दोसांझ यांचे जोरदार ‘ट्विटर’ युद्ध झाले. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना बरेच काही ऐकवले होते. इतकेच नाही तर दिल्लीच्या गुरुद्वारा शीख व्यवस्थापन समितीने कंगनाविरोधात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली होती.
कंगनाच्या चित्रपटांची प्रतिक्षा
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगना रनौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे तो पुढे ढकलला गेला आहे. हा चित्रपट तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. राजकारणापासून, चित्रपट कारकिर्दीत त्यांच्या योगदानावर हा चित्रपट आधारित असेल. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, कंगनाचा अभिनयही प्रेक्षकांना खूप आवडला आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय ती ‘तेजस’ आणि ‘धाकड’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(Kangana Ranaut and her family visited golden temple Amritsar)
हेही वाचा :
Photo : साराभाई V/S साराभाई ते ऑफिस ऑफिसपर्यंत, या टीव्ही मालिकांची होती चाहत्यांना भुरळ