Kangana Ranaut | इंस्टाग्रामवर भडकली ‘बॉलिवूड क्वीन’, म्हणाली पुढच्या निवडणुकीत भाजपसाठी ठरू शकतो धोकादायक!   

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. तिने नेहमी अशीच काही वक्तव्य करत असते, ज्यामुळे नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असतात.

Kangana Ranaut | इंस्टाग्रामवर भडकली ‘बॉलिवूड क्वीन’, म्हणाली पुढच्या निवडणुकीत भाजपसाठी ठरू शकतो धोकादायक!   
कंगना रनौत
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 11:24 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ट्विट्समुळे चर्चेत आली आहे. तिने नेहमी अशीच काही वक्तव्य करत असते, ज्यामुळे नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होत असतात. आतापर्यंत कंगना ट्विटरवर राग काढायची, पण आता तिने इंस्टाग्रामवरही आपला राग व्यक्त केला आहे. 2024च्या निवडणुकीत ते भाजपालाही धोका बनू शकते, असेही कंगना म्हणाली (Kangana Ranaut angry on Social Media Platform Instagram).

कंगनाने लिहिले की, ‘इन्स्टाग्रामवर सगळेच मूर्ख लोक भरलेले आहेत. येथे ज्यांचा आयक्यू कमी आहे, त्यांचे कौतुक केले जाते. मात्र, यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की येथे छोट्या व्यवसायाला चालना मिळते. परंतु, विरोधक आता याचा चुकीचा वापर करत आहेत. ते भाजपविरूद्ध द्वेष पसरवत आहेत.’

दुसर्‍या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, ‘ही मध्यमवर्गाची टिक-टॉक चर्चा आहे. या मूर्खांचे भांडवलदार, साम्यवादी आणि जिहादींनी अपहरण केले आहे. यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला धोका निर्माण होऊ शकतो. जर या विदूषक फॅशनसाठी शर्टखाली सायकलिंग शॉर्ट्स घालू शकतात, तर मग यांना कशानेही भ्रमित करता येऊ शकते.’

कंगनाने नंतर आणखी एक ट्विट केले आहे, ज्यात तिने पीएम मोदींचे कौतुक केले आहे. कंगनाने लिहिले की, ‘ते परिपूर्ण नेता आहेत, कुणाची बाहुली नाही. मातीचा लेक ज्याने स्वत: साठीच नव्हे, तर भारतासाठी स्वप्न पाहण्याची हिंमत केली. काहीही करा, त्यांचे काहीही नुकसान होणार नाही. ते आणखी उंचीवर जातील आणि तुम्ही जळतच राहाल.'(Kangana Ranaut angry on Social Media Platform Instagram)

पाहा कंगनाचे ट्विट

तापसीला ‘शीमॅन’ म्हटल्याने झाली ट्रोल

कंगनाने अलीकडेच तापसीबद्दल एक ट्विट केले होते, ज्यात तिने ‘शीमॅन खूप हॅपी होईल’, असे म्हटले होते. मात्र, नेटकऱ्यांना हा शब्द आवडला नाही. असे शब्द वापरल्याबद्दल त्यांनी कंगनाला खूप ट्रोल केले. तथापि, कंगनाने पुन्हा एकदा आपले स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, लोक इतके नकारात्मक कसे विचार करू शकता. मला वाटले की हा शब्द तिच्या रफ अँड टफ लूकला पूरक आहे. पण लोक इतका नकारात्मक विचार कसा करू शकतात हे मला समजत नाही.

जयललितांच्या बायोपिकमध्ये दिसणार कंगना

कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या ‘जयललिता’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. परंतु, त्यानंतर कंगनाने सांगितले होते की, तिचा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. थिएटरच्या आधी हा चित्रपट कोणत्याही व्यासपीठावर प्रदर्शित होणार नाही.

(Kangana Ranaut angry on Social Media Platform Instagram)

हेही वाचा :

मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडलाय अर्जुन कपूर, कौतुक करत म्हणाला ‘तिने मला खूप काही शिकवले’…

‘सैराट’मधली ‘आनी’ आता काय करते? जाणून घ्या ‘आर्ची’ची मैत्रीण साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल…

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.