मोठी बातमी | ‘लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर हीच योग्य वेळ’; कंगना राणावतच्या मनातलं आलं ओठांवर?

'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' ग्लोबल च्या दुसऱ्या पर्वात अभिनेत्री कंगना राणावत सहभागी झाली होती. लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्नांवर बोलताना कंगनाने लोकसभा निवडणूक लढण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाली जाणून घ्या.

मोठी बातमी | 'लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर हीच योग्य वेळ'; कंगना राणावतच्या मनातलं आलं ओठांवर?
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 6:16 PM

नवी दिल्ली | देशभरात लोकसभा निवडणूकीसाठी फिल्डिंग लावलेली पाहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना राणावतनेही लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे. TV9 च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये कंगनाने याबद्दल माहिती दिली. कंगना आता कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या पक्षाकडून निवडणुक लढवणार याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

निवडणूकीबाबत कंगना काय म्हणाली?

मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण खरे सांगायचे तर मला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर हीच योग्य वेळ असल्याचं, कंगना राणावतने म्हटलं आहे.  कंगनाच्या या विधानाची देशभरात चर्चा होताना दिसत आहे.  कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिला स्वत: ला निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचं तिने जाहीरपणे बोलून दाखवलंय.

RRR किंवा सत्यजीत रे यांचे सिनेमे असोत नाहीतर स्लमडॉग मिलेनिअर, तुम्हाला ग्लोबल व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी लोकल व्हावं लागेल असं सत्यजीत म्हणाले होते यावरच माझाही विश्वास आहे. आपण प्रामाणिक असणं आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीवर आणि संघर्षावर आधारित असलेले चित्रपट हे बनायला हवेत. आपल्या समाजाचा संघर्ष त्यामध्ये दाखवणाऱ्या स्टोरी असायल्या हव्या असं कंगनाने म्हटलं आहे.

मूळ हिमाचल प्रदेशची असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी तिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने या चर्चेला वेग आला. कंगनाने नड्डा यांच्यासोबतच्या भेटीचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे कंगना यंदा निवडणूकीमध्ये सहभाही होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता तिने जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.