Kangana Ranaut | मुव्ही माफियांच्या भीतीने अक्षय कुमारने केला सीक्रेट कॉल, कंगनाचा अजब दावा

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारनेही तिच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे, पण चित्रपट माफियांना घाबरत असल्यामुळे तो खुलून बोलू शकत नाही, असा दावा कंगना रनौतने केला आहे.

Kangana Ranaut | मुव्ही माफियांच्या भीतीने अक्षय कुमारने केला सीक्रेट कॉल, कंगनाचा अजब दावा
कंगना रनौत
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 11:01 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) ‘थलायवी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार प्रशंसा झाली. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारनेही तिच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे, पण चित्रपट माफियांना घाबरत असल्यामुळे तो खुलून बोलू शकत नाही, असा दावा कंगना रनौतने केला आहे. नेहमीच बेधडक विधानं करणार्‍या कंगनाने ही गोष्ट नुकतीच सोशल मीडियावर सांगितली (Kangana Ranaut said that akashay kumar call her secretly due to fear of movie mafia).

वास्तविक, कंगनाने एका ट्विटला उत्तर देताना लिहिले की, ‘बॉलिवूडमध्ये असे बरेच लोक आहेत, की ज्यांनी माझे कौतुक केले तर ते अडचणीत येऊ शकतील. मला बरेच सिक्रेट कॉल आणि मेसेजेस मिळाले आहेत. अगदी अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सनीही माझ्या ‘थलायवी’ चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले. पण, आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या चित्रपटाप्रमाणेच ते माझ्या चित्रपटाचे सार्वजनिक कौतुक करू शकत नाहीत. चित्रपट माफियांची भीती आहे ही.’

आता कंगनाचा हा दावा कितपत खरा आहे, ते फक्त अक्षय कुमार स्वत:च सांगू शकतो आणि तो अशा चित्रपट माफियांना खरोखरच घाबरत आहे की नाही, याचे खरे उत्तर केवळ स्वतः अक्षयच देऊ शकतो.

पाहा कंगनाचे ट्विट

 (Kangana Ranaut said that akashay kumar call her secretly due to fear of movie mafia)

‘चली-चली’ गाण्याची सोशल मीडियावर धूम

अलीकडेच कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘चली चली’ हे रिलीज करण्यात आले होते, ज्यात जयललिता यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले तेव्हाचे दिवस दाखवले गेले आहे. या गाण्यात कंगना प्रथम धबधब्यात तिची बोल्ड स्टाईल दाखवते आणि त्यानंतर ती रेट्रो लूकमध्ये देखील दिसली आहे. या गाण्यात कंगनाने जयललिताचे तरुणपणीचे दिवस कसे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे. इतकेच नाही तर या गाण्यानंतर सोशल मीडियावर एक ट्रेंडही सुरू आहे, ज्यात लोक या गाण्यावर थिरकत आहेत.

कंगनाने या चित्रपटासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. एवढेच नव्हे तर, यासाठी तिने शरीर परिवर्तनावरही बरीच मेहनत घेतली आहे. जयललिताच्या भूमिकेसाठी कंगनाने तब्बल 20 किलो वजन वाढवले ​​होते. यानंतर तिने पुन्हा एकदा वजन कमी केले आहे.

प्रमोशन न करण्याचा निर्धार!

कंगनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती या चित्रपटाचे प्रमोशन करणार नाही. या चित्रपटाचे यश तिने चाहत्यांच्या भरवशावर सोडले आहे. कंगना म्हणाली की, जया आईने लोकांसाठी भरपूर केले आहे, म्हणून आता त्यांच्या प्रेमापोटी या चित्रपटाला प्रेक्षक किती चांगला प्रतिसाद देतील, हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.

(Kangana Ranaut said that akashay kumar call her secretly due to fear of movie mafia)

हेही वाचा :

Happy Birthday Allu Arjun | स्नेहाशी लग्न करण्यासाठी अल्लू अर्जुनला करावी लागली होती भरपूर मेहनत! वाचा सुपरस्टारची लव्हस्टोरी…

Sweetu | निरागस चेहरा, भाबडं हास्य, स्वीटूचा बालपणीचा क्यूट फोटो पाहिलात का?

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.