Income Tax Raid | ‘हे तर छोटे प्लेयर…’, इन्कमटॅक्स धाडीनंतर कंगनाचा अनुराग-तापसीवर हल्लाबोल!

या छाप्या दरम्यान प्राप्तिकर विभागाला तापसीचा 20 कोटींचा बनावट खर्च आणि अनुरागच्या अघोषित उत्पन्नाची माहिती मिळाली. ज्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा या सेलेब्सवर टीका केली आहे.

Income Tax Raid | ‘हे तर छोटे प्लेयर...’, इन्कमटॅक्स धाडीनंतर कंगनाचा अनुराग-तापसीवर हल्लाबोल!
कंगनाची अनुराग-तापसीवर टीका
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 10:29 AM

मुंबई : तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मंटेना यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर आयकर विभागाने बुधवारी छापा टाकला. हा छापा गुरुवारीही सुरूच होता. वृत्तानुसार, या छाप्या दरम्यान प्राप्तिकर विभागाला तापसीचा 20 कोटींचा बनावट खर्च आणि अनुरागच्या अघोषित उत्पन्नाची माहिती मिळाली. ज्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा या सेलेब्सवर टीका केली आहे (Kangana Ranaut Slams taapsee pannu and Anurag kashyap over Income Tax Raid).

कंगनाने केलेले ट्विटमध्ये तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांना लक्ष करत, जोरदार टोले लगावले आहेत. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, ‘आयटी विभागाने असा दावा केला आहे की, त्यांच्या फोनमधून डेटा हटवला गेला आहे, यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आणि भागधारकांचा सहभाग देखील असू शकतो.’

…हे तर छोटे प्लेयर आहेत!

कंगनाने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, ‘डेटा पुनर्प्राप्त केला जाऊ शकतो. परंतु हे छोटे खेळाडू आहेत, आपण कल्पना करू शकता की, चित्रपटसृष्टीत या दहशतवादाची मुळे किती खोलवर रुजली असतील. ही लोकं भारताच्या पैशांचे नुकसान करत आहेत. सरकारने सर्वांसाठी चांगले उदाहरण म्हणून समोर आणले पाहिजे. हे लोक दहशतवाद्यांना या देशाचे तुकडे नाही विकू शकत. जय हिंद.’

कंगनाने गुरुवारी देखील तापसी आणि अनुराग यांच्यावर टीका केली होती. कंगनाने ट्विटद्वारे त्यांच्यावर झालेल्या इन्कमटॅक्स कारवाईबद्दल अधिकृत निवेदन दिले असून, त्यांना ‘चोर-चोर मौसरे भाई’ असेही संबोधले होते.

कंगनाचे ट्विट

जे चोर आहेत, ते चोरच राहणार!

हे लोक तुकडे-तुकडे गँगचे समर्थक असल्याचे म्हणत कंगनाने लिहिले की, “जे चोर आहेत ते फक्त चोरच असतात, ज्यांना मातृभूमीचे तुकडे करून ते विकायचे आहेत, ते हे लोक फक्त देशद्रोही आहेत. आणि देशद्रोह्यांना पाठिंबा देणारेही चोर आहेत. … कारण चोर-चोर भाऊबंद आहेत आणि ज्यांना हे चोर घाबरले आहेत, ते कोणी सामान्य माणूस नसून नरेंद्र मोदी आहेत.’(Kangana Ranaut Slams taapsee pannu and Anurag kashyap over Income Tax Raid)

काय वसूल केले?

प्राप्तिकर विभागाच्या प्रवक्त्या सुरभी आलुवालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी दरम्यान मोठ्या फिल्म प्रोडक्शन हाऊसच्या घोषित उत्पन्नात आणि बॉक्स ऑफिसवर मिळणाऱ्या प्रत्यक्ष उत्पन्नात म्हणजेच कर चुकवण्यामध्ये महत्त्वपूर्ण फरक आढळला आहे. चौकशीदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांना 300 कोटींच्या अघोषित उत्पन्नाबाबत कोणतेही योग्य उत्तर देता आले नाही.

सर्च ऑपरेशन मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथे केलं गेलं. घर आणि ऑफिसेस मिळून तब्बल 28 ठिकाणी छापे टाकले गेले. सर्च ऑपरेशन दरम्यान इनकम आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. इनकम टॅक्स विभागाला 350 कोटी रुपयांची टॅक्स चोरीची शंका आहे.

चौकशी सुरूच!

तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटी रुपयांची रिसिट रिकव्हर झाली. ज्याची तपासणी सुरु आहे. याशिवाय 20 कोटींच्या टॅक्सचोरीसंबंधी पुरावे मिळाले आहेत. असेच पुरावे तापसीविरोधातही मिळाल्याची माहिती समजत आहे. दोन टॅलेंट कंपन्या (फँटम आणि क्वान) यांच्याकडून मोठ्या रकमेचा डिजीटल डेटा व्हॉट्सअॅप, इमेल हार्ड डिस्कसह जप्त केले आहे. सर्च ऑपरेशन आणि चौकशी अजूनही सुरुच आहे.

छापे टाकण्यासाठी दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या ठिकाणी छापण्याच्या वेळी ईमेल, व्हॉट्सअॅप चॅट्स, हार्डडिस्कच्या रूपातील सर्व डिजिटल पुरावे एकत्र केले गेले आहेत. तसेच, 7 बँकेचे लॉकरही सापडले, जे तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या प्रवक्त्या सुरभि अलुवालिया यांच्या म्हणण्यानुसार छापे अजूनही सुरू आहेत.

(Kangana Ranaut Slams taapsee pannu and Anurag kashyap over Income Tax Raid)

हेही वाचा :

अनुराग, तापसीच्या अडचणी वाढणार; दोन दिवसांपासून चौकशी सुरुच, मोठे खुलासे होण्याची शक्यता?

Income Tax Raid | अबब! 350 कोटींची गडबड, इन्कमटॅक्स धाडीत काय काय सापडलं?

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.