‘जोया अख्तर’च्या एकाच चित्रपटातून 3 स्टारकिड्स करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, करण जोहर याच्यावरही मोठी जबाबदारी

| Updated on: Jan 03, 2023 | 7:06 PM

जोया अख्तरच्या द आर्चीज या चित्रपटामधून एकाच वेळी तब्बल तीन स्टारकिड्स लाॅन्च केले जाणार आहेत.

जोया अख्तरच्या एकाच चित्रपटातून 3 स्टारकिड्स करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, करण जोहर याच्यावरही मोठी जबाबदारी
Follow us on

मुंबई : स्टारकिड्ससाठी 2023 हे वर्ष अत्यंत महत्वाचे नक्कीच आहे. कारण या वर्षामध्ये एक किंवा दोन नव्हेतर तब्बल सात स्टारकिड्स बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहेत. होय तुम्ही एकदम बरोबर वाचत आहात. 2023 मध्ये सात स्टारकिड्स बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे एकाच बाॅलिवूड चित्रपटामधून तीन स्टारकिड्स पदार्पण करणार आहेत. यावेळी स्टारकिड्स लाॅन्च करण्याची मोठी जबाबदारी ही जोया अख्तरला देण्यात आलीये. जोया अख्तरच्या द आर्चीज या चित्रपटामधून एकाच वेळी तब्बल तीन स्टारकिड्स लाॅन्च केले जाणार आहेत.

जोया अख्तरच्या द आर्चीज या चित्रपटामधून खुशी कपूर बोनी कपूरची मुलगी आणि जान्हवी कपूरची लहान बहीण, सुहाना खान शाहरूख खान याची मुलगी, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे दिघेही द आर्चीजमधून लाॅन्च केले जाणार आहेत.

खुशी कपूर, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांना लाॅन्च करण्याची जबाबदारी ही जोया अख्तरवर आहे. अवनीश बड़जात्या यांच्यावरही दोन स्टारकिड्स लाॅन्च करण्याची जबाबदारी देण्यात आलीये. यामध्ये सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री आणि सनी देओल याचा लहान मुलगा राजवीर देओल याला अवनीश बड़जात्या लाॅन्च करणार.

स्टारकिड्सला लाॅन्च करायचे म्हटल्यावर करण जोहर कसा मागे राहून शकतो. करण जोहर याच्या चित्रपटातून संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर हिला लाॅन्च केले जाणार आहे. करण जोहरच्या बेधड़क या चित्रपटामध्ये शनाया कपूर महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान हा देखील करण जोहरच्या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. करण जोहर हाच सैफच्या मुलाला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार आहे. पश्मीना रोशन ही ऋतिक रोशन याची चुलत बहीण असून ही देखील 2023 मध्येच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.