Video | कश्मीरा शाहचं बॉडी ट्रान्सफॉरमेशन, ब्लू बिकिनीत दिसला ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडीओ…
अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटीपैकी एक आहे. कश्मीरा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करण्याबरोबरच बिकिनीत टोन्ड बॉडीही फ्लाँट करताना दिसते.
मुंबई : अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय सेलिब्रिटीपैकी एक आहे. कश्मीरा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करण्याबरोबरच बिकिनीत टोन्ड बॉडीही फ्लाँट करताना दिसते. कश्मीरा अनेकदा बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक बिकिनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अतिशय चर्चेत आला आहे (Kashmera Shah flaunt toned body in blue bikini share video on social media).
कश्मीरा शाहने नुकतेच बिकिनी परिधान करून एक नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मॅडोनाच्या हिट गाण्यावर डान्स मूव्ह्स आणि फोटो पोझ करताना दिसत आहे. कश्मीरा शाहचं बॉडी ट्रान्सफॉरमेशन पाहून चाहते तिचे खूप कौतुक आकारत आहेत.
पाहा कश्मीराचा व्हिडीओ
View this post on Instagram
व्हिडीओ शेअर करताना कश्मीराने लिहिले की, ‘मनाला प्रेरणा द्या, शरीराला त्याचे कार्य करू द्या. मॅडोना असेही म्हणतात की, आपण पांढरे किंवा काळे आहात, याने काही फरक पडत नाही किंवा आपण मुलगा आहात की मुलगी, लगेच हार मानणारे लोक स्वतःला मर्यादा घालतात. आपण स्वतःच आपल्या जीवनाचे सुपरस्टार आहात.’
निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये कश्मीरा खूपच बोल्ड आणि मादक दिसत आहे. त्याच वेळी, तिचा फिटनेस पाहून चाहते देखील आश्चर्य चकित झाले आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कश्मीराच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया…
कश्मीरा शाहने शेअर केलेल्या बोल्ड व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. फायर आणि हार्ट इमोजीच्या सहाय्याने ते कश्मीराच्या बॉडी ट्रान्सफॉरमेशन कौतुक करत आहेत (Kashmera Shah flaunt toned body in blue bikini share video on social media).
कश्मीराचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
कश्मीराचा आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये कश्मीरा ‘कुली नंबर 1’च्या ‘हूस्न है सुहाना’ या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडीओ शेअर करताना कश्मीराने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘वरुण आणि सारा या उत्कृष्ट गाण्यावर नाचण्यापासून मी स्वत:ला रोखू शकत नाही’. कश्मीराची ही स्टाईल जोरदार व्हायरल झाली आणि चाहत्यांनाही ती खूप पसंत पडली.
सोशल मीडियावर सक्रिय कश्मीरा
कश्मीरा आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेक वेळा तिचे बोल्ड व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांनाही हे खूप आवडले आहेत.
कश्मीरा अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आहेत. दोघांची जोडी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कश्मीरा वयाने कृष्णापेक्षा खूप मोठी आहे. या जोडप्याला सरोगसीद्वारे जन्मलेले दोन मुलगे देखील आहेत. अलीकडेच कश्मीरा तिचा नवरा कृष्णा सोबत या कपिल शर्माच्या कार्यक्रमात दिसली होती. या मंचावर दोघांनीही त्यांच्या जीवनाविषयी अनेक खुलासे केले होते.
(Kashmera Shah flaunt toned body in blue bikini share video on social media)
हेही वाचा :
PHOTO | सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हाय गर्मी..’