Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif Corona Positive | कतरिना कैफही कोरोनाच्या विळख्यात, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती!

आता अभिनेत्री कतरिना कैफदेखील (Katrina Kaif) कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कतरिनाने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Katrina Kaif Corona Positive | कतरिना कैफही कोरोनाच्या विळख्यात, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती!
कतरिना कैफ
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 5:47 PM

मुंबई : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बॉलिवूड कलाकार देखील आता एकामागून एक कोरोनाला बळी पडत आहेत. अक्षय कुमार (Akshay Kumar), आमीर खान (Amir Khan) आणि विकी कौशलनंतर (Vicky kaushal) आता अभिनेत्री कतरिना कैफदेखील (Katrina Kaif) कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कतरिनाने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे (Katrina Kaif tested Corona Positive share post on social media).

कतरिना कैफने इंस्टाग्राम स्टोरीवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. ही बातमी आता समोर आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. तर, हे जाणून अभिनेत्रीचे काही चाहते खूप अस्वस्थ झाले आहेत. कालच अभिनेता विकी कौशलने त्याला कोरोना झाल्याची पुष्टी केली होती.

कतरिना झाली क्वारंटाईन!

अभिनेत्री कतरिना कैफने पोस्टद्वारे म्हटले आहे की, ‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी ताबडतोब स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. सध्या मी घरातच अलगीकरणत राहणार आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की, त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा आणि स्वत:ची काळजी घ्या.’

पाहा कतरिनाची पोस्ट :

सेलेब्स अडकतायत कोरोनाच्या विळख्यात

देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स देखील या विळख्यात अडकले आहेत. नुकताच अक्षय कुमार या विषाणूच्या विळख्यात अडकला आहे. आता त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘राम सेतु’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षयबरोबरच या चित्रपटातील 45 कलाकारही या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांत आलिया भट्ट, रणबीर कपूर, आमीर खान, संजय लीला भन्साळी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोना विषाणू संक्रमित झाले आहेत (Katrina Kaif tested Corona Positive share post on social media).

‘टायगर 3’च्या चित्रीकरणावर होणार परिणाम!

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सलमान खानसोबत आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या चित्रीकरणात व्यस्त होती. कोरोनामुळे मुंबईतच ‘टायगर 3’साठीचा तुर्कीश सेट तयार करण्यात आला आहे. या सेटवर तोफखाना टाकी आणि ग्रेनेड इत्यादींचा उपयोग केला जाणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र आता कतरिनाला कोरोनाची लागण झाल्याने या चित्रीकरणावर मोठा परिणाम होऊ शकतो.

त्यातच निर्मात्यांनी जूनमध्ये इस्तंबूल आणि दुबईला शुटींग करण्याचा विचार केला असून, सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना खूप आवडणार आहे. ही जोडी जेव्हा जेव्हा एकत्र पडद्यावर येते, तेव्हा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळते. दोघांनी ‘टायगर जिंदा है’, ‘एक था टायगर’, ‘मैने प्यार क्यू किया’, आणि ‘पार्टनर’सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘टायगर 3’ चित्रपटात सलमान खान रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे.

(Katrina Kaif tested Corona Positive share post on social media)

हेही वाचा :

Radhe Update | कोरोनाचा मोठा फटका, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

Kartik Aaryan | कोरोनामुक्त झालेल्या कार्तिक आर्यनने खरेदी केली Lamborghini, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.