Adah Sharma | ‘द केरळ स्टोरी’च्या नायिकेची बिघडली तब्येत, अदा शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल
अभिनेत्री अदा शर्मा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कमांडो सीरीजच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीची तब्येत अचानक जास्तच बिघडली होती.
Adah Sharma Hospitalized : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) फेम अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अदा हिला फूड पॉयझनिंग आणि डायरियाचा त्रास होऊ लागल्याने तिची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे उपचारांसाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
आगामी सीरिजच्या प्रमोशनसाठी जात असतानाच अदा हिची तब्येत अचानक खालावली. तिच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ती गंभीर तणावाचा सामना करत असून तिला डायरियाचाही बराच त्रास होत असून सध्या डॉक्टरांनी तिला निगराणीखाली ठेवले आहे.
‘कमांडो’ च्या प्रमोशनदरम्यान बिघडली
अदा शर्मा सध्या तिच्या ‘कमांडो’या आगामी सीरिजच्या प्रमोशनमध्ये बरीच व्यस्त होती. या चित्रपटात ती भावना रेड्डी हिची भूमिका साकारणा आहे. ॲक्शन थ्रिलर सीरिज ‘कमांडो’ ही लवकरच प्रदर्शित होणार असून याध्ये अदा सोबत प्रेम हाही दिसणार आहे.यामधून तो पदार्पण करत आहे. याशिवाय वैभव तत्ववादी, अमित सियाल, तिग्मांशु धूलिया आणि मुकेश छाब्रा यांचीही या सीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत.
View this post on Instagram
या ओटीटीवर रिलीज होणार कमांडो’
विपुल अमृतलाल शाह आणि सनशाइन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड च्या दिग्दर्शनखाली बनलेला हा चित्रपट लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ‘कमांडो’ फ्रॅंचायझीची सुरुवात 2013 मध्ये ‘कमांडो: ए वन मॅन आर्मी’ने झाली. या चित्रपटात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले, त्यानंतर आता अदा शर्मा यामधून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार आहे.
‘द केरळ स्टोरी’ ने मिळाली लोकप्रियता
‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाद्वारे अदा शर्माला खूप प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील त्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. अदाने याआधीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला तेवढी लोकप्रियता मिळाली नाही. आता अदा पुन्हा एकदा ‘कमांडो’सोबत धमाल करायला सज्ज झाली आहे.