‘केजीएफ’ या कन्नड चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षकांना ‘केजीएफ: चाप्टर 2’विषयी (KGF Chapter 2) उत्सुकता निर्माण झाली आहे. हा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा सुरू झाली आहे. ‘केजीएफ 2’ने ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटाचाही विक्रम मोडला आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे चार दिवस राहिले असताना केजीएफ 2 च्या हिंदी व्हर्जनची जवळपास 11 कोटी रुपयांची तिकिटं विकली गेली आहेत. या तुलनेत RRRच्या हिंदी व्हर्जनचं फक्त 5 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग (Advance Booking) झालं होतं. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कन्नड चित्रपटाने उत्तर भारतात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मुंबई आणि पुण्यात केजीएफ 2 च्या हिंदी व्हर्जनचा पहिला शो हा पहाटे 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यावरूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पहायला मिळते. या चित्रपटाच्या तिकिटांची किंमतसुद्धा काही ठिकाणी अधिक आहे. मुंबई 1450 ते 1500 रुपये इतका तिकिटाचा दर आहे. तर दिल्लीत 1800 ते 2000 रुपये इतका दर आहे. केजीएफ चाप्टर 2चं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’चा हा सीक्वेल आहे.
#Xclusiv… ‘KGF 2’ 6 AM SHOWS & MORE…
? #KGF2 advance booking PHENOMENAL
? Morning shows to start as early as 6 am in #Mumbai and #Pune
? Ticket prices at *select locations*: ₹ 1450 / ₹ 1500 per seat [#Mumbai] and ₹ 1800 / ₹ 2000 per seat [#Delhi]#Toofan is arriving! pic.twitter.com/wnv5aaZQ1j— taran adarsh (@taran_adarsh) April 9, 2022
केजीएफ चाप्टर 1ने 250 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आता दुसरा भाग यापेक्षा अधिक कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलार गोल्ड फील्ड्समधील सोन्याच्या खाणीचं साम्राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉकीची (यश) कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेता यश हा रॉकीच्या भूमिकेत आहे. यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा:
रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका