KKBKKJ : सलमान खान याच्या 150 करोडच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाने अवघ्या ‘इतक्या’ कोटींचा कमावला गल्ला
सलमान खानच्या या चित्रपटानं म्हणावी तशी कमाई केल्याचं दिसत नाहीये. नुकतंच या चित्रपटाचं फायनल कलेक्शन समोर आलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. ईद दिवशी प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या या चित्रपटानं म्हणावी तशी कमाई केल्याचं दिसत नाहीये. नुकतंच या चित्रपटाचं फायनल कलेक्शन समोर आलं आहे.
सलमानच्या या चित्रपटानं ईद दिवशी चांगली कमाई केली होती. पण त्यानंतर या चित्रपटानं म्हणावी तशी कमाई केलेली नाहीये. 150 करोडच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली नसून या चित्रपटाची कमाई जास्त झालेली नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं विदेशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 52.75 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात सलमानच्या या चित्रपटानं 20 कोटी एवढी कमाई केली आहे. तसंच महामारीनंतर हा चित्रपट पठाण चित्रपट वगळता सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत केजीएफ 2 आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
दरम्यान, ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या जगभरातील एकूण कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं 175 कोटी इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाला तू झुठी मैं मक्कार या चित्रपटानं मागे टाकत तब्बल 195 कोटी एवढी कमाई केली आहे.