रेखाला पाहून सासूने आशीर्वाद नाही तर उगारली होती चप्पल, वाचा विनोद मेहरा-रेखाची लव्हस्टोरी…

हिंदी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) आजही तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते. रेखाने तिच्या चित्रपटाच्या कारकीर्दीची सुरूवात 1958च्या 'रागिनी' या चित्रपटापासून केली होती.

रेखाला पाहून सासूने आशीर्वाद नाही तर उगारली होती चप्पल, वाचा विनोद मेहरा-रेखाची लव्हस्टोरी...
रेखा आणि विनोद मेहरा
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 9:11 AM

मुंबई : हिंदी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) आजही तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते. रेखाने तिच्या चित्रपटाच्या कारकीर्दीची सुरूवात 1958च्या ‘रागिनी’ या चित्रपटापासून केली होती. ज्येष्ठ कलाकार विनोद मेहरा (Vinod Mehra) यांच्याविषयी बोलायचे तर, त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये ‘अमर प्रेम’, ‘अनुराग’, कुंवारा बाप’ आणि ‘लाल पत्थर’सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार विनोद मेहरा यांचे तीन विवाह झाले होते, परंतु तरीही आयुष्यभर त्यांना आपला जीवनसाथी सापडला नाही, ही अतिशय दुखःद बाब आहे (Know About Actress Rekha and Vinod mehra love story).

अभिनेता विनोद मेहरा यांचे आपल्या आईवर खूप प्रेम होते आणि आईने केलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा भरपूर  विश्वास होता. मीडिया रिपोर्टनुसार, आईने हट्टाने विनोद मेहरा यांचा विवाह मीना ब्रोकाशी केला. काही काळानंतर विनोद मेहरा आणि मीनामध्ये खटके उडू लागले, त्यांचे लग्न फार काल टिकू शकले नाही. त्यानंतर विनोद मेहरा यांचे हृदय अभिनेत्री बिंदिया गोस्वामीवर आले. विनोद मेहराने प्रथम पत्नीला घटस्फोट न देता बिंदियाशी लग्न केले. पण, त्यांचे हे दोन्ही विवाहही फार काळ टिकू शकले नाहीत.

विनोद मेहरा आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीची चर्चा

मग, त्यानंतर अशी वेळ आली जेव्हा विनोद मेहरा आणि रेखा यंच्या प्रेमाचा अँगल जगासमोर आला आणि चर्चिला जाऊ लागला. मीडिया रिपोर्ट नुसार अभिनेत्याने रेखाशी चक्क मंदिरात लग्न केले होते. विनोद मेहरा यांनी रेखा यांना आपल्या घरी आणले, तेव्हा त्यांची आई रेखाला सून म्हणून स्वीकारत नव्हती. तिने कधीच रेखला त्याला आपल्या घरी येऊ दिले नाही. इतकेच नाही तर रेखाला फार शिवीगाळ देखील केला (Know About Actress Rekha and Vinod mehra love story).

गुपचूप केले होते लग्न

यासीर उस्मान यांचे पुस्तक  ‘रेखा : अन अनटोल्ड स्टोरी’च्यानुसार विनोद मेहराने रेखासोबत लग्न केले होते. पुस्तकानुसार, रेखा आणि विनोद यांचे लग्न कोलकाता येथे पार पडले. लग्न करून हे दाम्पत्य विनोद मेहरा यांच्या घरी आले, तेव्हा विनोदच्या आई कमला मेहरा खूप चिडल्या आणि त्यांनी आशीर्वाद देण्याऐवजी चक्क चप्पल उगारली. रेखा त्यांच्या पायाला स्पर्श करू लागताच, त्यांनी रेखाला जोरदार धक्का दिला. रेखा घराच्या दाराशी उभी होती आणि तिची सासू तिला शिवीगाळ करत होती. तथापि, नंतर विनोद मेहरा यांनी हस्तक्षेप केला आणि आईची समजूत काढून तिला शांत केले. मात्र, नंतर विनोद मेहरा यांनी रेखाला सांगितले की, तिने तिच्या घरी परत जावे आणि काही काळ तिथेच रहावे. काही कालावधीनंतर रेखा आणि विनोद मेहरा यांचे हे लग्न देखील मोडले.

(Know About Actress Rekha and Vinod mehra love story)

हेही वाचा :

Divya Bharti | वाईट वाटल्यावर स्वतःलाच करायची दुखापत, मुलाखती दरम्यान दिव्या भारतीच्या आईचा दावा!

Video | महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला अन् शिल्पा शेट्टीने नवऱ्याच्या हातात झाडू दिला! पाहा धमाल व्हिडीओ…

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.