Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan | ज्युनिअर बच्चनवर ओढावलं संकट, लखनऊ पोलिसांनी थांबवले चित्रीकरण, वाचा नेमकं झालं…

अभिषेक बच्चन सध्या लखनऊमध्ये असून, तिथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. मात्र, दरम्यान, लखनऊ पोलिसांनी अभिषेक बच्चन याच्या या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे.

Abhishek Bachchan | ज्युनिअर बच्चनवर ओढावलं संकट, लखनऊ पोलिसांनी थांबवले चित्रीकरण, वाचा नेमकं झालं...
अभिषेक बच्चन
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 11:53 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आजकाल आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये खूप व्यस्त आहे. अभिषेक बच्चन सध्या लखनऊमध्ये असून, तिथे त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. मात्र, दरम्यान, लखनऊ पोलिसांनी अभिषेक बच्चन याच्या या चित्रपटाचे शूटिंग थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. लखनऊमधील बेगम हजरत महल पार्कमध्ये हे शूटिंग सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे (Lucknow police stopped Abhishek Bachchan Upcoming film shooting due to corona protocols).

मीडिया रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन यांच्या या टीमला चित्रपटाची शूटिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु, असे असूनही पोलिसांनी याचे शूटिंग थांबवले. यासंदर्भात पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की, कोरोना प्रोटोकॉल पाहता अभिषेक बच्चन यांच्या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

वास्तविक असे म्हटले जात आहे की, अभिषेक बच्चन आणि त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगचे वृत्त समजताच आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांनी या पार्कजवळ गर्दी करून जमायला सुरुवात केली. कोरोना व्हायरस संसर्गाची तीव्रता पाहून, काही लोकांकडून शूटिंगबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. तक्रार मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शूटिंग थांबवण्यास सांगितले.

या वृत्तानुसार, मध्य विभागाचे डीसीपी सुमन कुमार म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे, कारण शूटिंगदरम्यान सुमारे जवळपास 60 जण पार्कमध्ये उपस्थित होते. असं सांगितलं जात आहे की, जेव्हा चित्रपटाच्या टीमला चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली, तेव्हा त्यांना कोव्हिड-19 प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यास सांगण्यात आले होते (Lucknow police stopped Abhishek Bachchan Upcoming film shooting due to corona protocols).

कोरोना प्रतिबंध नियमांनुसार उद्याने, सार्वजनिक ठिकाणी बंद करण्यात आली होती. मात्र, शूटिंगसाठी दुपारच्या वेळेत हे पार्क उघडण्यात आले होते. यावेळी क्रू आणि जमाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले, त्यामुळे शूटिंग थांबवावी लागली. इतकेच नाही तर चित्रपटाच्या टीमने स्थानिक लोकांवरही गुंडगिरी केल्याचा आरोप केला होता. क्रू मेंबर्सचे म्हणणे आहे की, काही स्थानिक लोकांनी पोलिसांसमोर असभ्य कृत्य केले, त्यानंतर हाणामारीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी हा जमाव पांगवला.

‘द बिग बुल’मध्ये अभिषेकच्या अभिनयाची वाहवा…

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याच्या ‘द बिग बुल’ (The Big Bull) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून, डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट हर्षद मेहता (Harshad Mehta) यांनी 1992 मध्ये केलेल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यावर आधारित आहे. कुकी गुलाटी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला मिश्रित समीक्षा मिळाली आहेत. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, तर काही लोक अभिषेकच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत आहेत.

(Lucknow police stopped Abhishek Bachchan Upcoming film shooting due to corona protocols)

हेही वाचा :

Happy Birthday Mandira Bedi | लग्नाच्या 12 वर्षानंतर आई बनली मंदिरा बेदी, फिटनेस-बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींनाही देते टक्कर!

चिमुकला लढतोय दुर्मिळ आजाराशी, उपचारासाठी 16 कोटींची गरज, अजय देवगणने केले मदतीचे आवाहन!

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....