Malaika Arora Vaccine | कोरोनाची लस घेतानाही दिसला मलायकाचा ग्लॅमरस अंदाज, पहिलाच डोस घेताना म्हणाली…

मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अभिनेत्री तिच्या फोटोंनी आणि व्हिडीओंनी आपल्या चाहत्यांना भुरळ घालत असते. आता मलायकाने तिचा कोरोना लस घेतानाचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Malaika Arora Vaccine | कोरोनाची लस घेतानाही दिसला मलायकाचा ग्लॅमरस अंदाज, पहिलाच डोस घेताना म्हणाली...
मलायका अरोरा
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 1:46 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनाला भुरळ घालत असते. मलायका तिच्या ग्लॅमरस स्टाईल आणि खास लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. प्रत्येकजण या अभिनेत्रीच्या फिटनेसचा वेडा आहे. मलायका आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. त्याच वेळी, आता मलायकाने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे (Malaika Arora took first dosage of Corona Vaccine).

मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अभिनेत्री तिच्या फोटोंनी आणि व्हिडीओंनी आपल्या चाहत्यांना भुरळ घालत असते. आता मलायकाने तिचा कोरोना लस घेतानाचा फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मलायकाने घेतली कोरोना लस

अलीकडेच मलायकाने इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती कोरोना लसीचा पहिला डोस घेताना दिसत आहे. एक आरोग्य कर्मचारी मलायकाला कोरोना लस देताना दिसत आहे.

यावेळीसुद्धा मलायका अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती. ती व्हाईट कलरच्या टॉप आणि रेड मास्क परिधान केलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले की, ‘आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, कारण आपण पूर्णपणे #wereinthist!  योद्धांनो, या #WarAgainstVirus मिळून जिंकूया. लवकरच लस घेण्यास विसरू नका! आणि हो मी लस घेण्यास पात्र आहे! (Malaika Arora took first dosage of Corona Vaccine)

मलायका 47 वर्षांची आहेत आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील सर्व लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत अजिबात उशीर न करता मलायकाने कोरोन लस घेतली आहे. मलायका अरोराला देखील कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने शक्य ती सगळी सावधगिरी बाळगत कोरोन लस घेतली आहे.

अर्जुनच्या हातात दिसलं मंगळसूत्र!

मलायका आणि अर्जुन कधी लग्न करणार याची फॅन्सना प्रतीक्षा आहे. या दोघांच्याही लग्नाची बातमी सतत चर्चेत आहे. अशा परिस्थितीत नुकताच अर्जुनचा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये त्याच्या हातात मंगळसूत्र दिसले होते. त्यानंतर चाहत्यांना असे वाटले की, अर्जुनने मलायकासाठी हे मंगळसूत्र विकत घेतले असावे.

परंतु, हे मंगळसूत्र मलायकासाठी नाही तर, हा फोटो चित्रपट ‘की अँड का’च्या वेळचा आहे. अर्जुनने आपला चित्रपट ‘की अँड का’ ला 5  वर्ष पूर्ण झाल्याच्या आठवणी सांगताना शेअर केला आहे. याबरोबरच अर्जुन म्हणाला की, मला वाटते की, करीना कपूरने या चित्रपटाचा एक सिक्वेल बनवावा.

(Malaika Arora took first dosage of Corona Vaccine)

हेही वाचा :

Disha Patani | ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’, दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा, चाहतेही झाले घायाळ!

Amitabh Bachchan vaccine : बिग बी सहकुटुंब लसीकरणाला, मात्र ‘या’ कारणामुळे अभिषेकला लस घेता आली नाही!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.