Sirf Ek Bandaa… : मनोज बाजपेयीचा हैराण करणारा लूक, अखेर आसारामवरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Sirf Ek Bandaa Kaafi Hai Trailer : मनोज बाजपेयी यांनी आसाराम बापूंशी संबंधित बलात्काराचा खटला लढणाऱ्या वकिलाची भूमिका साकारली आहे.
![Sirf Ek Bandaa... : मनोज बाजपेयीचा हैराण करणारा लूक, अखेर आसारामवरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीज Sirf Ek Bandaa... : मनोज बाजपेयीचा हैराण करणारा लूक, अखेर आसारामवरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/09023221/Manoj-Bajpayee-1.jpg?w=1280)
मुंबई : मनोज बाजपेयी हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. चाहते नेहमीच त्याचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्याच्या नवीन चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. तर आता मनोज बाजपेयीच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
मनोज बाजपेयीचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘सिर्फ एक बंदा काफी है’ असं त्याच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. मनोजच्या या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट आसाराम बापूंशी संबंधित बलात्कार प्रकरणात न्याय मिळविलेल्या वकील पीसी सोलंकीची स्टोरी आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर खूपच दमदार आहे. तसंच हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. 23 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म G5 वर मनोज बाजपेयीचा हा कोर्टरूम ड्रामा प्रदर्शित होणार आहे. तसंच हा चित्रपट काही चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये काय आहे?
‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका साइन बोर्डने होते, ज्यामध्ये आसाराम बापू बलात्कार प्रकरणातील पीडितेचा खटला लढणाऱ्या पीसी सोलंकीचे नाव दिसते. म्हणजेच या चित्रपटात मनोज बाजपेयी हीच भूमिका साकारताना दिसत आहेत. “मी माझ्या आयुष्यात अनेक केसेस पाहिल्या आहेत. अनेकांना त्यांच्या साक्षीकडे पाठ फिरवतानाही मी पाहिले. मात्र ही लढत दीर्घकाळ चालणार आहे”, असा डायलॉग मनोज बाजपेयी म्हणताना दिसत आहे.
कसं आहे मनोज बाजपेयीचं पात्र?
चित्रपटात मनोज बाजपेयीचं पात्र धार्मिक आहे. तो स्कूटरने प्रवास करतो. तो एक सामान्य माणूस आहे. तसंच तो 16 वर्षीय बलात्कार पीडितेचा खटला लढतो, ज्यात आरोपी आसाराम बापू आहेत. आसाराम बापूंचे लाखो अनुयायी आहेत. जो एक शक्तिशाली व्यक्ती आहे. या ट्रेलरमध्ये आसाराम बापूची झलकही पाहायला मिळत आहे.
निर्मात्यांनी हा चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचं वर्णन केलं आहे. या ट्रेलरमध्ये सत्ता विरुद्ध इच्छाशक्तीच्या लढाईत किती अडचणी येतात हे दाखवण्यात आले आहे. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांनी केलं आहे.