“तू अमिताभ बच्चनसोबत काम करताना वाटलं, साला आपणच काम करतोय!”, Hemangi Kavi कडून Chhaya Kadam यांच्या Jhund मधील कामाचं कौतुक
हेमांगी कवीने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यात तिने नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमावर भाष्य केलंय. तिने अभिनेत्री छाया कदम यांच्या झुंडमधील कामाचं कौतुक केलंय
मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही नेहमी तिची मतं खुलेपणाने मांडताना दिसते. आताही हेमांगीने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यात तिने नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या झुंड सिनेमावर (Jhund Movie) भाष्य केलंय. तिने अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या झुंडमधील कामाचं कौतुक केलंय. छाया कदम यांनी या सिनेमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या खास व्यक्तीची (पत्नी) भूमिका निभावली आहे. “प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आयुष्यात साला एकदा तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळावं. सुप्त इच्छा कधीतरी पूर्ण होऊ देत यासाठी प्रार्थना करत असतो. किती स्वप्न पडतात की आपण बच्चन सोबत सीन करतोय याची. निदान मला तरी पडतात. माझ्यासाठी स्वप्नवतच आहे ते.पण झुंड च्या निमित्ताने छाया कदम तू ते खरं करून दाखवलंस”, असं हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
“एक सीन मिळावा किंवा एक डायलॉग ही चालेल किंवा passing सुद्धा मिळालं त्यांच्या फ्रेममध्ये तरी भरून पावू असं वाटतं. पण तू चक्क त्यांच्या बायकोचा रोल किंवा पार्टनर म्हणू शकतो असा रोल केलास. तेवढ्याच ताकदीनं उभी राहिलीस. कुठून आणलंस एवढं बळ यार? खरंच एक अभिनेत्री म्हणून, एक मैत्रीण म्हणून तुझा अभिमान वाटतो आणि तुझ्या संपूर्ण अभिनय प्रवासाचं कौतुक ही. और क्या चाहीए! कसलं भारी वाटतंय काय सांगू यार. यासाठी नागराज मंजुळे चे आभार मानेन की त्याने तुझ्यातल्या कसदार अभिनेत्रीवर, मैत्रिणीवर एवढा विश्वास दाखवला! किती खात्री असेल त्याला तुला कास्ट करायचं! नाहीतर इथं बरेच जण नुसतंच ‘तू किती भारी अभिनेत्री आहेस, कमाल मैत्रीण आहेस’ असं सांत्वनपर बोलून ‘अगं, निर्मात्याला, प्रथितयश कलाकारासमोर अमुक अमुक अभिनेत्रीच कास्ट करायचीय गं, माझ्या हातात असतं ना तर तुलाच कास्ट केलं असतं’ हे ‘बच्चन’ देऊन पळ काढतात”, असं हेमांगी तिच्या पोस्टमध्ये म्हटलीये.
“असो, तुला त्यांच्या सोबत काम करताना पाहून वाटलं साला आपणच काम करतोय. क्या बात है… Proud proud and extremely happy! Love u रे! आणि माझी तुझ्या सोबत काम करायची इच्छा एक नाहीतर दोन चित्रपटांमुळे पूर्ण झाली म्हणून मज्जा!”, असं हेमांगी म्हणाली आहे.
View this post on Instagram
तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी छाया कदम यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांचा अभिनय आवडल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगुबाई काठियावाडी या सिनेमातही छाया कदम यांनी काम केलं आहे.
संबंधित बातम्या