Mother’s Day | बॉलिवूड विश्वाची लाडकी ‘आई’, ‘मदर्स डे’च्या निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्री निरुपा रॉयबद्दल…

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘आई’ साकारणाऱ्या निरुपा रॉय यांना बॉलिवूडच्या ‘रुपेरी पडद्यावरची आई’ म्हणून ओळखले जाते.

Mother’s Day | बॉलिवूड विश्वाची लाडकी ‘आई’, ‘मदर्स डे’च्या निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्री निरुपा रॉयबद्दल...
निरुपा रॉय
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 10:08 AM

मुंबई : ‘तू पैदा होते ही मर क्यों नहीं गया…, ये दिन देखने से पहले मैं मर क्यों नहीं गई…, तुझे इस दिन के लिए पाल पोसकर बड़ा किया था..’, चित्रपटांमधील हे संवाद आजही सर्रास सगळीकडे ऐकू येतात. हे संवाद ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर ज्यांनी हे संवाद म्हटले आहेत, ती अभिनेत्री तुम्हाला आठवते का? ‘मेरे पास माँ है’ म्हणत याच अभिनेत्रीवरून दोन दिग्गज भांडले होते. हा, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्या ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निरुपा रॉय (Nirupa Roy) यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत (Mothers Day 2021 special Bollywood famous mother fame Actress Nirupa Roy Story).

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘आई’ साकारणाऱ्या निरुपा रॉय यांना बॉलिवूडच्या ‘रुपेरी पडद्यावरची आई’ म्हणून ओळखले जाते.

या आईला पडद्यावर बघून आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात येते पाणी!

अशी आई जिच्या आयुष्यात केवळ दुःख असते. कधी ती फाटलेल्या साडीत रडताना आणि विव्हळताना दिसली, तर कधी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आकांत करताना दिसली. स्क्रीनवरील आईच्या या वेदना पाहून लोकांच्या डोळ्यातून आजही अश्रू वाहतात. जवळपास 50वर्षांच्या कारकीर्दीत निरुपा रॉय यांनी 270पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. निरुपा रॉय दिसायला खूप सुंदर होती. ब्लॅक अँड व्हाईट या चित्रपटांमधून त्यांनी रंगीत चित्रपट जगात प्रवेश केला, तेव्हा अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि धर्मेंद्र यासारख्या अनेक नामांकित कलाकारांची आई साकारत, त्यांनी सर्वाधिक यश मिळवले.

कारकीर्दीच्या सुरुवातीस त्यांना रुपेरी पडद्यावरुन ओळख मिळू शकली नाही, परंतु नंतर आईच्या भूमिकांनी त्यांना ‘बॉलिवूडची आई’ असा टॅगच मिळाला. निरुपा रॉय यांना चित्रपटांमध्ये फारसा रस नव्हता. परंतु, म्हणतात ना की जे नशिबात असते ते घडतेच, असेच काहीसे निरुपा रॉय यांच्या बाबतीत घडले.

वयाच्या 15 व्या वर्षी झाले लग्न!

कोकिला किशनचंद्र बलसारा ऊर्फ निरुपा रॉय यांचा जन्म गुजरातच्या वलसाड येथे 4 जानेवारी 1931 रोजी एका सामान्य हिंदू कुटुंबात झाला होता. निरुपाला खूप अभ्यास करायचा होता, पण त्यांचे वडील जुन्या विचारांचे होते. रेल्वेमध्ये काम करायचे. मुलींना जास्त शिक्षण दिले जाऊ नये, असा वडिलांचा विचार होता. याचाच परिणाम असा झाला की निरुपाचे वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी लग्न झाले होते.

निरुपा रॉय यांचे पती नाव कमल रॉय होते. ते एक अतिशय आनंदी आणि स्वतंत्र व्यक्ती होते. त्यांनी कधीही निरुपाला कशासाठीही रोखले नाही आणि आवर घातला नाही. लग्नानंतर थोड्याच काळात कमल निरुपासोबत स्वप्नांच्या शहरात, मुंबईत आले. कमल रॉय यांना अभिनयाची खूप आवड होती. कमलने एकदा वृत्तपत्रात एक जाहिरात वाचली की, एका चित्रपट निर्मात्याला त्याच्या नवीन चित्रपटासाठी नवीन चेहऱ्यांची गरज आहे. विष्णु कुमार व्यास असे त्या चित्रपटाच्या निर्मात्याचे नाव होते (Mothers Day 2021 special Bollywood famous mother fame Actress Nirupa Roy Story).

कमल रिजेक्ट, तर निरुपा सिलेक्ट!

कमल रॉय यांनी ऑडिशनची तयारी केली होती. त्याने निरुपालाही पाठपुरावा करण्यास सांगितले. निरुपासुद्धा त्यांच्यासमवेत विष्णु कुमार व्यास यांच्या कार्यालयात गेल्या. कमल आणि निरुपा दोघांनीही ऑडिशन दिले, पण कमल यांना रिजेक्ट केले गेले, तर निरुपा यांची निवड झाली. निरुपा रॉय यांचा चित्रपटाचा प्रवास इथून सुरु झाला. मात्र, हा ब्रेक त्यांना गुजराती चित्रपटात मिळाला होता. हिंदी भाषेत त्यांचा प्रवास अजून सुरू झाला नव्हता.

काही गुजराती चित्रपटांनंतर निरुपाला हिंदी सिनेसृष्टीत पहिला ब्रेक 1946च्या ‘अमर राज’ या चित्रपटातून मिळाला. तथापि, निरुपा रॉय यांना सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक जयंत देसाई यांनी मोठा ब्रेक दिला. 1950च्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटात निरुपाला अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरला. या चित्रपटा नंतर निरुपा रॉय यांना एकामागून एक धार्मिक चित्रपट मिळण्यास सुरुवात झाली.

तारुण्य सरल्यावर मिळाले यश

दूरदर्शनवर प्रसारित झालेला टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या मुलाखतीदरम्यान निरुपा रॉय म्हणाल्या की, मी सर्व प्रकारच्या चित्रपटांत काम केल्यामुळे मला खूप आनंद झाला. मग ते सामाजिक, ऐतिहासिक किंवा पौराणिक कोणतेही चित्रपट असोत. त्यांनी 40 पौराणिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्याचेही सांगितले होते, जी एक विक्रम नोंद आहे. अशा पौराणिक चित्रपटांमध्ये फारच कमी अभिनेत्रींनी काम केले असेल.

तथापि, निरुपा रॉय यांना तारुण्यात जितकी प्रसिद्धी मिळाली नाही, तितकीच ती नंतर आईची भूमिका साकारून मिळाली. निरुपा रॉय स्वत: म्हणत असत की, वयस्कर झाल्यानंतर कलाकार निवृत्त होतो, परंतु हे माझ्या बाबतीत घडले नाही. मी जसजशी मोठी होत गेले, तसतशी मी अधिक व्यस्त झाले. विशेषत: जेव्हा मला हिंदी सिनेमाच्या सुपरस्टार्सची आई साकारायला मिळाली. निरुपा रॉय यांची यशस्वी कारकीर्द होती. चित्रपटांमधून आईची भूमिका साकारणाऱ्या निरुपा रॉय यांना 2004 साली हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

(Mothers Day 2021 special Bollywood famous mother fame Actress Nirupa Roy Story)

हेही वाचा :

Hindustani Bhau | ‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी केली अटक, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Video | चार वर्षांच्या लेकाला हॉटेलमध्ये सोडून परदेशी गेली श्वेता तिवारी, पती अभिनवचा दावा!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.