Jhund movie : प्रतीक्षा संपली, नागराजच्या ‘झुंड’च्या प्रदर्शनाची तारीख बिग बींकडून जाहीर

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे.

Jhund movie : प्रतीक्षा संपली, नागराजच्या 'झुंड'च्या प्रदर्शनाची तारीख बिग बींकडून जाहीर
jhund film, Nagraj Manjule, Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 7:47 PM

मुंबई : मराठमोळ दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित झुंड (Jhund movie) या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक टीझर यापूर्वीच रिलीज झाला होता. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता लागली होती. अखेर बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वत: नागराज मंजुळेच्या या सिनेमाची तारीख जाहीर केली. येत्या 18 जूनला झुंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Nagraj Manjule Jhund movie release date out big b amitabh bachchan in lead role)

सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे.

झुंड थिएटरमध्ये रिलीज होतोय : बच्चन

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर झुंडची रिलीज डेट जाहीर केली. झुंडच्या पोस्टरसह अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन लिहिलं, “कोरोनाने आपल्याला अनेक झटके दिले, मात्र आता पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. आपण थिएटर्समध्ये परतलो आहोत. झुंड सिनेमा 18 जून 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे”

सत्य घटनेवर आधारित सिनेमा

बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.

ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

सिनेमाचा वाद कोर्टात

दरम्यान, या सिनेमाचा वाद कोर्टात गेला होता. चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये या सिनेमा वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने सिनेमा रिलीज करण्यास स्थगिती घातली होती. प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

पाहा टिझर

संबंधित बातम्या :

नागराज मंजुळे दिग्दर्शित बिग बींच्या ‘झुंड’चा टीझर लाँच     

सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे ‘झुंड’ रखडला, प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

(Nagraj Manjule Jhund movie release date out big b amitabh bachchan in lead role)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.