Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput suicide case | एनसीबीकडून ‘त्या’ अफवेचे खंडन, केला मोठा खुलासा

या सर्व अफवा असून यामध्ये काहीही तत्थ नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. (NCB Sushant Singh Rajput suicide case)

Sushant Singh Rajput suicide case | एनसीबीकडून 'त्या' अफवेचे खंडन, केला मोठा खुलासा
सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 7:04 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajpu) आत्महत्येचे नेमके कारण लवकरच समजेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. या प्रकरणासंबंधी एनसीबी (NCB) लवकरच चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सर्व अफवा असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. तसेच, सुशांतसिंहच्या प्रकरणात (Sushant Singh Rajput suicide case) ड्रग्ज तस्करीचा प्रकार समोर आल्यानंतर रोज नवनवीन धागेदोरे हाती लागत असल्याचे एनसीबीने सांगितले आहे. या सर्व माहितीसंबंधीची चौकशी बाकी असून त्यानंतरच चार्जशीट दाखल केली जाईल, असे एनसीबीच्या सूत्रांनी  सांगितले आहे. ( NCB denied that they will file chargesheet in Sushant Singh Rajput suicide case)

सुशांतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यांच्या चाहत्यांसाठी तर हा धक्काच होता. सुशांतच्या आत्महत्येची निष्पक्ष चौकशी करुन त्याने हे पाऊल नेमके कशामुळे उचलले?, याचा शोध घेण्याची मागणी त्याच्या चाहत्यांकडून त्यावेळी केली गेली. चौकशीदरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज तस्करीचा प्रकार समोर आल्यानंतर त्या दिशेनेही पोलीस आणि एनीसीबीने आपला तपास सुरु केला. त्यांच्या तपासात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची चौकशी झाली. यामध्ये दीपिका पदुकोन, रकुलप्रीत सिंह, करिश्मा प्रकार, श्रद्धा कपूर, सारा अली खान अशा दिग्गज अभिनेत्यांचा त्यात समावेश होता.

या चौकशीनंतर ईडीनेसुद्धा मनी लाँड्रींग संदर्भात आपला क्लोझर रिपोर्ट तयार केला असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात एनसीबीकडून लवकरच चार्जशीट दाखल केली जाऊ शकते, असे सांगितले जाऊ लागले. मात्र, या गोष्टीमध्ये कोणतेही तथ्य नसून सुशांचे आत्महत्या प्रकरण, ड्रग्ज तस्करी या सर्व प्रकरणांची चौकशी केली जात आहे. आणखी काही गोष्टी बाकी आहेत. तसेच या प्रकरणातील मोठा ईलेक्ट्रॉनिक डेटा हाती लागलेला असून त्याचाही अभ्यास करायचा आहे. या सर्व गोष्टींची चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच चार्जशीट दाखल केली जाईल, असे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघडे पडले होते. या ड्रग्ज तस्करीमध्ये दिग्गज कलाकारांचे नाव समोर आले होते. या सर्वांची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यानंतर सुशांतसिहं राजपूत याची आत्महत्या आणि बॉलिवूडमधील ड्रग्ज तस्करी या दोन्ही गोष्टींची चौकशी केली जात आहे. या सर्व घटनाक्रमामध्ये सुशांतच्या आत्महत्येमागचे गूढ लवकर उलगडावे, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

SSR Case | सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखीव ठेवला

अजूनही रियाचं सुशांतवर प्रेम, Love is Power म्हणत टीकाकारांना खास उत्तर

“होय, मी ड्रग्ज घेतलं” रिया चक्रवर्तीची एनसीबीच्या चौकशीत कबुली

( NCB denied that they will file chargesheet in Sushant Singh Rajput suicide case)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.