ऋषी कपूर यांच्या आठवणीने नीतू कपूर झाल्या भावूक, म्हणाल्या ‘तुमच्याशिवाय आयुष्य आता…’
ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा अनेकदा त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करतात. आज नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) गेल्या वर्षी 30 एप्रिलला या जगाचा निरोप घेऊन दूर निघून गेले. ऋषी कपूर यांच्या अशा अचानक जाण्याच्या धक्क्यामुळे त्यांचे कुटुंब आणि चाहते अद्याप दुःखातून सावरलेले नाहीत. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा अनेकदा त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करतात. आज नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक पोस्ट शेअर केली आहे (Neetu Kapoor Share Emotional post remembering rishi kapoor).
नीतू कपूर यांनी पती ऋषीसोबत एक जुना फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘मागील वर्ष जगासाठी दुःख आणि कष्टप्रद होते. आमच्यासाठी ते थोडे अधिक होते कारण आम्ही तुम्हाला गमावलं. असा एकही दिवस गेलेला नाही ज्यात आम्ही तुमच्याबद्दल बोललो नाही किंवा तुमची आठवण काढली नाही. कधी तुमचा सल्ला तर कधी तुमचा विनोद. चेहऱ्यावर हास्य घेऊन आम्ही वर्षभर राहिलो आहोत. ते नेहमी आमच्या मनात राहतील आणि आम्ही हे मान्य केले आहे की, आता त्यांच्याशिवाय आयुष्य असेच राहणार आहे, परंतु आयुष्य पुढे जाणारच आहे’.
नीतू कपूर यांची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे. यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनी देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. त्या म्हणाल्या, ‘आम्ही सर्वजण त्याची आठवण काढतो’. त्याचवेळी ऋषी कपूरची मुलगी रिद्धिमाने पोस्टवर हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.
पाहा पोस्ट
View this post on Instagram
(Neetu Kapoor Share Emotional post remembering rishi kapoor)
कर्करोगाशी सुरु होती झुंज
ऋषी कपूर यांना ल्युकेमिया होता. हा पांढऱ्या रक्त पेशींचा कर्करोगाचा एक प्रकार आहे. यावर उपचार घेण्यासाठी ऋषी कपूर अनेक वेळा अमेरिकेत गेले. 2018मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर 11 महिने उपचारही झाले. सप्टेंबरमध्ये ऋषी कपूर अमेरिकेतून परत आले. कुटुंबासमवेत बराच वेळ घालवला.
30 एप्रिल 2020ला घेतला जगाचा निरोप
28 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी ऋषी कपूरची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेथे तातडीने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याचवेळी त्यांचे रूग्णालयातील काही व्हिडीओही समोर आले होते. परंतु 30 एप्रिल रोजी सकाळी 8 : 45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(Neetu Kapoor Share Emotional post remembering rishi kapoor)
हेही वाचा :
ऋषी-राजीवच्या निधनानंतर एकटे पडले रणधीर कपूर, वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय!