Video | ‘बैसाखी’च्या शुभ मुहूर्तावर नीतूला आली ऋषी कपूरची आठवण, डान्स व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…

बॉलिवूडमध्ये सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी बऱ्याच वेळी ऋषी कपूर यांच्या आठवणीत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Video | ‘बैसाखी’च्या शुभ मुहूर्तावर नीतूला आली ऋषी कपूरची आठवण, डान्स व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या...
नीतू कपूर
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 7:17 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सत्तर-ऐंशीचे दशक आपल्या मनमोहक भूमिकांनी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी बऱ्याच वेळी ऋषी कपूर यांच्या आठवणीत अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज बैसाखी निमित्त नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूरसोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे (Neetu Kapoor Share special video with rishi kapoor on the occasion of baisakhi).

नीतू कपूरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, ‘आपल्या सर्वांना बैसाखीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्व निरोगी रहा. हा व्हिडिओ 1978च्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटातील ‘तेरे नाम तेरे नाम’ या गाण्याचा आहे. व्हिडीओमध्ये नीतू कपूर आणि ऋषी कपूर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

पाहा व्हिडीओ

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांबरोबरच हा फोटो बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील आवडला आहे. रवीना टंडन, माहीप कपूर, सबा पटौदी, मनीष मल्होत्रा ​​यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनी नीतू कपूर यांच्या या व्हिडीओ कमेंट केल्या आहेत.

ऋषी कपूर यांची कारकीर्द

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होते. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली होती. ऋषी कपूर यांनी जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत काम केले. या दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट गाजले होते (Neetu Kapoor Share special video with rishi kapoor on the occasion of baisakhi).

रणधीर कपूर यांना आली भावांची आठवण

रणधीर यांनी काही दिवसांपूर्वी ऋषी ​​आणि राजीव यांचा तारुण्यातील एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये ऋषी आणि राजीव बऱ्यापैकी देखणे दिसत होते. ऋषी आणि राजीवच्या आठवणीत रणधीर कपूर यांनी लिहिले होते की, ‘माझ्या दोन्ही लाडक्या भावांनो तुमची आठवण येते आहे. तुम्ही जिथे असाल तिथे दोघेही सुखी असाल अशी आशा आहे.’

अभिनेते ऋषी कपूर यांचे गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी निधन झाले होते. जवळजवळ दोन वर्षे त्यांनी कर्करोगाशी लढाई लढली.  परंतु, 30 एप्रिल रोजी त्यांची ही लढाई संपुष्टात आली. त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर घराणे अद्याप पूर्णपणे सावरले नव्हते, तेच 9 फेब्रुवारी 2021 रोजी राजीव कपूर यांचे देखील निधन झाले.

(Neetu Kapoor Share special video with rishi kapoor on the occasion of baisakhi)

हेही वाचा :

Video | आधी मुक्के मग प्रेम, बॉक्सिंग करताना आमीरच्या लेकीने बॉयफ्रेंडला मारली मिठी!

PHOTO | शहनाज गिलचा क्यूट अँड हॉट लूक पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.