मुंबई : ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी बाॅलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. आज जरी ते या जगात नसले तरीही ऋषी कपूर यांचे चाहते आणि कुटुंबिय आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांची पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूरने (Neetu Kapoor) एक खास पोस्ट शेअर करत सुंदर फोटो शेअर केलायं. नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो पाहून प्रत्येकजण भावूक झाल्याचे चित्र असून नीतू यांच्या फोटोवर (Photo) अनेक मोठ्या स्टार्सने कमेंट केल्या आहेत. तसेच या पोस्टला चाहते देखील लाईक करत आहेत.
नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर ऋषी कपूर यांची आठवण करणारा एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो याअगोदर कधीही कोणी शेअर केला नव्हता. या फोटोमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर खूप हॅप्पी दिसतायतं. फोटोमध्ये ऋषी कपूर यांनी एक मोठा चश्मा घातल्याचे दिसते असून नीतू कपूरही हसत कॅमेऱ्याकडे पाहू पोज देत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.
नीतू कपूर यांनी हार्ट इमोजी टाकून ऋषी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आईने शेअर केलेल्या या फोटोवर रिद्धिमा कपूरने ही कमेंट केलीयं. करण कुंद्रा, डब्बू रतनानी या स्टारनेही ऋषी कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या गोड आठवणीचा हा फोटो अनेकांनी आपल्या पेजवर शेअरही केलायं.