Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री नेहा धूपियाची अचानक तब्येत बिघडली, सेटवरच बेशुद्ध; हेल्थ अपडेट समोर

एमटीव्ही रोडीज XX च्या सेटवर नेहा धूपिया अचानक बेशुद्धी झाली. तिला लगेचच शुद्धीवर आणण्यात आले आणि तिने शूटिंगही पुन्हा सुरू केले. नेहाने आपण ठिक असल्याचं स्पष्ट केलं. तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि प्रवासामुळे तिची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जातं.

अभिनेत्री नेहा धूपियाची अचानक तब्येत बिघडली, सेटवरच बेशुद्ध; हेल्थ अपडेट समोर
Neha Dhupia Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 11:33 PM

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या तब्येतीबाबतची बातमी आहे. रिअॅलिटी शो ‘एमटीव्ही रोडीज XX’ ची गँग लीडर नेहा धूपियाची अचानक तब्येत बिघडली आहे. सेटवर शुटिंग सुरू असतानाच नेहा अचानक बेशुद्ध पडली. त्यामुळे सेटवर सर्वांचीच तारांबळ उडाली. नेहाला शुद्धीवर आणण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत होते. नेहा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने आपण ठिक असल्याचं सहकाऱ्यांना सांगितलं. तसेच तिने शुटिंगही सुरूच ठेवलं. युनिटने शुटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतलेला असतानाही नेहाने मात्र शुटिंग सुरू ठेवलं.

सेटवर झालेल्या प्रकाराबद्दल नेहाने प्रतिक्रिया दिली आहे. एक छोटासा हेल्थ इश्यू होता. त्यामुळे त्रस्त होण्याची गरज नाही, असं तिने म्हटलं आहे. बेशुद्ध पडल्यानंतर नेहाने शुटिंग रद्द करण्या ऐवजी छोटासा ब्रेक घेतला. त्यानंतर ती पुन्हा कामाला लागली. रिअॅलिटी शो रोडीजमुळे सध्या नेहाचं शेड्यूल अत्यंत बिझी आहे. या शोसाठी तिला देशातील वेगवेगळ्या शहरात जावं लागत आहे. मुलाबाळांपासून ती जवळपास महिनाभर दूर आहे. बाहेरचं खाणं, दगदग आणि प्रवास यामुळे तिची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जात आहे.

नेहमीच तत्पर

नेहा बेहोश झाल्याची घटना नव्या प्रोमोत दाखवण्यात आली होती. त्यानंतर इंटरनेटवरही नेहाच्या आजारपणाची चर्चा रंगली होती. नेहाला चक्कर आल्यामुळे ती पडल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, तिने शुद्धीत आल्यावर लगेच कामाला सुरुवात केली. आपण फिट असल्याचं तिने दाखवून दिलं. एमटीव्ही रोडीज XX ची लीडर बनण्यासाठी आपण तयार आहोत हे तिने दाखवून दिलं. नेहाने मीडियाशी संवादही साधला. ही छोटीशी घटना होती. फक्त मला चक्कर आली. पण या घटनेनंतर मी आता चांगली चालू फिरू शकते. आम्ही नेहमीप्रमाणेच मी या शोसाठी एक्साइटेड आहे. रोडीज नेहमीच सर्व मर्यांदा ओलांडत आला आहे. प्रत्येक संकटावर मात करायला मला हा प्रवास शिकवतो. मला कोणीच रोखू शकत नाही, असं ती म्हणाली.

डेडिकेटेड व्यक्ती

या शोच्या प्रॉडक्शनशी संबंधित एकाने तर नेहाच्या डेडिकेशनला सलाम केला. नेहाचं डेडिकेशन अत्यंत कमालीचं आहे. तिच्या व्यस्थ शेड्यूलमध्ये आरोग्याच्या समस्या असूनही ती काम करते. तिने आपलं काम चोखपणे पार पाडलं. गजबजाट असलेल्या शहरापासून एखाद्या छोट्या खेड्यातही ती तितकीच अॅक्टिव्ह होती, असं या व्यक्तीने सांगितलं. ‘एमटीव्ही रोडीज XX’ अॅक्शन, ड्रामा घेऊन टीव्हीवर परत आला आहे. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये नेहाने स्पर्धक रुशाली यादव आणि हर्ष अरोडा यांची चांगलीच उलटतपासणी केली होती.

सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा.
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो.
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार.
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी...
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक.
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय.
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल.
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय.
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं.
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी.