Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL Rahul : सुनील शेट्टीचा फास्ट जावाई, लग्नाआधीच घरासह शेजारी पण फिक्स, केएल राहुलनं कुठे घेतलं घर?

केएल राहुलने कार्टर रोड वांद्रे येथे सी फेसिंग येथे इमारत भाड्याने घेतली आहे.

KL Rahul : सुनील शेट्टीचा फास्ट जावाई, लग्नाआधीच घरासह शेजारी पण फिक्स, केएल राहुलनं कुठे घेतलं घर?
केएल राहुल आणि अथिया शेट्टीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 2:11 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि आलीया भटच्या लग्नानंतर आता क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीच्या (aathiya shetty) लग्नाचे वेध लागले आहेत. यांच्या लग्नांच्या चर्चा इतक्या रंगल्या आहेत की या दोघांची रोज एकतरी बातमी चर्चेत असते. यातच आता एक नवी बातमी समोर आली आहे. केएल राहुलने कार्टर रोड वांद्रे येथे सी फेसिंग येथे 4 बीएचके इमारत भाड्याने घेतली आहे. याचं वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिलं आहे. एका रिपोर्टनुसार या भाड्याने घेतलेल्या इमारतीचे दरमहा भाडे दहा लाख रुपये इतके आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्ता असं म्हटलंय की या जोडप्याला त्यांचे प्रेमाचे घरटे सापडले आहे. मुंबईतील पाली हिल येथील इमारतीत पूर्ण मजला त्यांनी घेतला आहे. अतिथा आणि केएल राहुल स्वत: संधू पॅलेस नावाच्या इमारतीत राहणार आहे. ते या नव्या इमारतीपासू फक्त दोन इमारतींच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे त्यांचे नवे शेजारी रणबीर कपूर आणि आलीया भट्ट असल्याचीही माहिती आहे.

दोघेही चर्चेत असतात

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल अनेकदा त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असतात. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच लग्न करणार आहेत.अथिया शेट्टी या वर्षाच्या हिवाळ्यात बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत लग्न करून तिच्या आयुष्याचा एक नवीन प्रवासाला सुरू करू शकते. मात्र, यात इमारत घेऊन त्यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना चर्चेचा एक मुद्दाच दिलाय.

कॉमन फ्रेंडद्वारे भेटले

अथिया आणि केएल राहुल यांच्यातील रोमान्स कधी आणि कसा सुरू झाला? मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल एका कॉमन फ्रेंडद्वारे भेटले होते. मात्र,याबाबत अधिकृत माहिती नाही. जेव्हा दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेस सुरुवात झाली.अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांनीही या लव्ह बर्ड्सना त्यांचे लव्ह लाईफ खाजगी ठेवण्यासाठी मदत केली. जेव्हा-जेव्हा सुनील शेट्टीला अथिया आणि राहुलच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने याला केवळ मीडिया रिपोर्ट्स म्हटले व वेळ मारून नेली.केएल राहुलने अथिया शेट्टीच्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर अथियासोबतचे नाते अधिकृत केले. केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतचा एक क्यूट रोमँटिक फोटो शेअर करून एक खास कॅप्शन लिहिलं होत.

हे सुद्धा वाचा

कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.