ऋषी कपूर यांनी फोटो शेअर करत रणबीरसह ‘या’ व्यक्तीला देखील दिला होता लग्न करण्याचा सल्ला!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. पूर्वी दोघे त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळत असत आणि एकमेकांना केवळ चांगले मित्र म्हणत. पण आता रणबीरने सर्वांना आपल्या नात्याबद्दल सांगितले आहे.

ऋषी कपूर यांनी फोटो शेअर करत रणबीरसह 'या' व्यक्तीला देखील दिला होता लग्न करण्याचा सल्ला!
ऋषी कपूर, रणबीर आणि आलिया
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 6:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. पूर्वी दोघे त्यांच्या नात्याबद्दल बोलणे टाळत असत आणि एकमेकांना केवळ चांगले मित्र म्हणत. पण आता रणबीरने सर्वांना आपल्या नात्याबद्दल सांगितले आहे. लग्नाआधीच आलिया कपूर कुटुंबात रममाण झाली आहे. ती अनेकदा रणबीर कपूरच्या कुटूंबासमवेत वेळ घालवताना दिसली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, ऋषी कपूर यांनी  रणबीरसोबतच ‘या’ व्यक्तीला देखील लग्न करण्याचा सल्ला दिला होता. चला तर आपण ‘त्या’ व्यक्तीबद्दल जाणून घेऊया…( Not Alia Bhatt Rishi Kapoor wanted ranbir kapoor to marry ayan mukerji)

2018 मध्ये ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये रणबीर कपूर त्याचा सर्वात चांगला मित्र आणि चित्रपट निर्माता अयान मुखर्जी (Ayan Mekerji) सोबत दिसला होता. ऋषी कपूर यांनी तो फोटो शेअर करुन, रणबीरसोबत त्याच्या जिवलग ‘मित्रा’ने देखील लग्न करावे, असा सल्ला दिला होता.

पाहा पोस्ट

ऋषी कपूर यांनी हा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘बेस्ट फ्रेंड्स. आता जर तुम्ही दोघांनी लग्न केले, तर काय होईल? हाय टाईम.’

(Not Alia Bhatt Rishi Kapoor wanted ranbir kapoor to marry ayan mukerji)

रणबीर-अयानचे एकत्र काम

अभिनेता रणबीर कपूर आणि निर्माते अयान मुखर्जी यांनी ‘वेक अप सिड’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला होता आणि येथूनच दोघांची मैत्री सुरू झाली. अयान आणि रणबीर दोघेही एकमेकांच्या अडचणींच्या काळात पाठीशी उभे राहिलेले दिसतात. बर्‍याचदा दोघेही एकत्र सुट्टीवर देखील जातात, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ‘वेक अप सिड’नंतर दोघेही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात रणबीरसह आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील.

आलियाची रणबीरला साथ!

अभिनेत्री आलिया भट्ट रणबीरसोबत त्याच्या कठीण काळात उभी राहिली आहे. गेल्या वर्षी ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. या दरम्यान आलिया भट्ट नेहमीच रणबीरसोबत दिसली. इतकेच नाही, तर ती रणबीरच्या कुटूंबाचीही खास काळजीही घेत होती. काही काळापूर्वी रणबीरने आलियासोबतच्या आपल्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. त्याने म्हटले होते की, कोरोना महामारी आली नसती, तर त्याचे आणि आलियाचे लग्न झाले असते. या मुलाखतीत रणबीरने आलियाबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल सर्वांना सांगितले होते. अलीकडेच दोघे सुट्टी साजरी करण्यासाठी मालदीवमध्ये गेले होते.

(Not Alia Bhatt Rishi Kapoor wanted ranbir kapoor to marry ayan mukerji)

हेही वाचा :

‘पीएम नरेंद्र मोदी’ फेम संदीप सिंह बनवणार ‘स्वातंत्रवीर सावरकरां’वर चित्रपट, महेश मांजरेकर सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

Sushant Singh Rajput Case | सिद्धार्थ पिठाणीची अटक रियाला देखील अडचणीत आणणार? 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.