RRR Movie : “सिनेमावर प्रेम केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार”, ज्युनियर NTR कडून चाहत्यांसाठी भावूक संदेश
ज्युनियर एनटीआरने सिनेरसिकांचे आभार मानलेत. "RRR च्या यशामध्ये तुम्हा रसिक मायबापांचा मोठा हात आहे. तुम्ही सिनेमावर प्रेम केलं नसतं तर आम्ही एवढं घवघवीत यश मिळवू शकलो नसतो. हा सिनेमा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा सिनेमा आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार", असं राम चरण म्हणाला आहे.
मुंबई : आरआरआर (RRR Movie) हा सिनेमा बॉक्स ऑफिस कल्ला करतोय. या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मोठ्या पडद्यावर हा सिनेमा निव्वळ धुमाकूळ घालतोय. अश्यात अभिनेता ज्युनियर एनटीआरने (NTR) सिनेरसिकांचे आभार मानलेत. “RRR च्या यशामध्ये तुम्हा रसिक मायबापांचा मोठा हात आहे. तुम्ही सिनेमावर प्रेम केलं नसतं तर आम्ही एवढं घवघवीत यश मिळवू शकलो नसतो. हा सिनेमा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा सिनेमा आहे. या निर्व्याज प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार”, असं राम चरण म्हणाला आहे.
राम चरणने मानले आभार
आरआरआर सिनेमातील अभिनेता ज्युनियर एनटीआरने सिनेरसिकांचे आभार मानलेत. “RRR च्या यशामध्ये तुम्हा रसिक मायबापांचा मोठा हात आहे. तुम्ही सिनेमावर प्रेम केलं नसतं तर आम्ही एवढं घवघवीत यश मिळवू शकलो नसतो. हा सिनेमा माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा सिनेमा आहे. या निर्व्याज प्रेमासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार”, असं राम चरण म्हणाला आहे. त्याने आलिया भटचेही आभार मानले आहेत. “आलिया तू उर्जेचं केंद्र आहेत. तुझ्यामुळे सिनेमाला चार चांद लागलेत”, असंही तो म्हणाला आहे.
On ‘RRR’ massive success, Jr NTR pens a special note for cast, crew, fans
Read @ANI Story | https://t.co/ERWeS1nwya#RRRMovie #JrNTR #RRR pic.twitter.com/m2QCdCXTyL
— ANI Digital (@ani_digital) March 29, 2022
हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. कालही या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्या दिवशी या सिनेमाने भारतात 19 कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात या सिनेमाने 17 कोटी कमावले आहेत. या सिनेमाची एकूण भारतातील कमाई 91.50 कोटी इतकी आहे. तर RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची जगभरातील कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे.
या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करत आहेत. शोले, नाचो नाचो,इत्थरा, राम राघव ही या सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या गाण्यांचं म्युझिक काळजात घर करतंय.
संबंधित बातम्या