मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खानचे (Aamir Khan) चाहते ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या बहुचर्चित चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल रोज काही ना काही अपडेट समोर येतात. नुकताच चित्रपटातील तिसरे गाणे आता रिलीज झाले. फिर ना ऐसी रात आयेगी हे गाणे रिलीज करण्यात आले. टी-सीरीजने हे गाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केले आहे. या गाण्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर (Kareena Kapoor) आहेत. कहानी आणि मैं की करो नंतर आमिरच्या चित्रपटातील हे तिसरे गाणे आहे जे रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे चाहत्यांना हे गाणे प्रचंड आवडले आहे.
आमिरच्या चित्रपटातील हे गाणेही लिरिकल व्हिडिओ म्हणून रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडिओ अद्याप रिलीज झालेला नाही. हे गाणे अरिजित सिंहने म्हटंले आहे तर प्रीतमने संगीत दिले आहे. चित्रपटाचे हे गाणे एनटीएएलएस अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे, हे गाणे चाहत्यांना खूपच आवडतांना दिसते आहे. या गाण्यातून चित्रपटात आमिर आणि करीनामध्ये दूरावा निर्माण झाल्यासारखे वाटते आहे.
आमिर खान देखील प्रत्येक गाण्यामागे खूप मेहनत घेत आहे, तो सांगत आहे की या गाण्यात काय असावे आणि काय नसावे कारण जेव्हा कहानी चित्रपटाचे पहिले गाणे आले होते. आमिर खानच्या या चित्रपटात त्याच्या सोबत करीना कपूर खान दिसणार आहे. पण त्याच्याशिवाय नागा चैतन्य देखील या चित्रपटात दिसणार आहे, नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे, हा चित्रपट 1994 च्या अमेरिकन चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. आमिर खानचा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.