Oscars 2021 | नोमॅडलँडसाठी Chloe Zhao यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर, इतिहासातील दुसरीच महिला दिग्दर्शक

नोमॅडलँड चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि अभिनेत्री या तीन मुख्य पुरस्कारांसह सोहळ्यात बाजी मारली. (Oscars 2021 Nomadland Best Picture)

Oscars 2021 | नोमॅडलँडसाठी Chloe Zhao यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर, इतिहासातील दुसरीच महिला दिग्दर्शक
Oscars 2021 Nomadland Best Picture
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 9:06 AM

लॉस अँजेलस : जगभराचे लक्ष लागून राहिलेले अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ‘ऑस्कर’ 2021 (Oscars Awards 2021) यांची घोषणा करण्यात आली. च्लोए झाओ (Chloe Zhao) यांना नोमाडलँड (Nomadland) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर मिळाला. ‘ऑस्कर’च्या 93 वर्षांच्या इतिहासात हा पुरस्कार पटकावणाऱ्या त्या दुसऱ्याच महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. नोमॅडलँड हाच सर्वोत्कृष्ट चित्रपटही ठरला. तर अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (Frances McDormand) यांना नोमॅडलँडमधील फर्नच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्कर मिळाला. दरवर्षीच्या परंपरेला छेद देत सर्वोत्कृष्ट चित्रपटाऐवजी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराची अखेरीस घोषणा करण्यात आली. अँथनी हॉपकिन्स (Anthony Hopkins) यांनी मँक सिनेमातील भूमिकेसाठी हा पुरस्कार पटकावला. (Oscars 2021 Nomadland wins Best Picture Chloe Zhao Best Director at 93rd Academy Awards)

लॉस अँजेलसमधील युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर या दोन स्थळांवर ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 2001 पासून डॉल्बी थिएटर हे ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी निश्चित झालेले स्थळ आहे. कोविड19 प्रादुर्भाव असूनही अकॅडमीने व्हर्चुअल कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला.

सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात द फादर, जुडास अँड द ब्लॅक मसिहा, मॅंक, मिनारी, नोमॅडलँड, प्रॉमिसिंग यंग वूमन, साऊंड ऑफ मेटल, द ट्रायल ऑफ द शिकागो या 7 चित्रपटांना नामांकनं मिळाली होती. तर मॅंक 10 नामांकनांसह अग्रेसर होता. तर द फादर, जुडास अँड द ब्लॅक मसिहा, मिनारी, नोमॅडलँड, साऊंड ऑफ मेटल आणि द ट्रायल ऑफ द शिकागो यांना प्रत्येकी सहा नामांकने होती. मात्र नोमॅडलँड चित्रपटाने तीन मुख्य पुरस्कारांसह सोहळ्यात बाजी मारली.

ऑस्कर विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

च्लोए झाओ (Chloe Zhao) चित्रपट : नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता

अँथनी हॉपकिन्स (Anthony Hopkins) चित्रपट : मँक

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (Frances McDormand) चित्रपट : नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट चित्रपट

नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर

सोल (Soul)

सर्वोत्कृष्ट मूळ गाणे

फाईट फॉर यू – जुडास अँड द ब्लॅक मसिहा

मानवतावादी पुरस्कार (Humanitarian Award)

टायलर पेरी

सर्वोत्कृष्ट संकलन

साऊंड ऑफ मेटल

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

मँक

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन

मँक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

यून यू-जंग (मिनारी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

डॅनियल कलूया (जुडास अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स

टेनेट (Tenet)

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – फीचर

माय ऑक्टोपस टीचर

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – शॉर्ट सब्जेक्ट

कोलेट (Colette)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म

सोल (Soul)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू (If anything happens i love you)

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म

टू डिस्टंट स्ट्रेंजर्स (two distant strangers)

सर्वोत्कृष्ट ध्वनी

साऊंड ऑफ मेटल (Sound Of metal)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा

मा रेनीज ब्लॅक बॉटम

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा (मेकअप- हेअर डिझाईन)

मा रेनीज ब्लॅक बॉटम

सर्वोत्कृष्ट इंटरनेशनल फीचर फिल्म

अनदर राऊंड

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा (अडाप्टेड स्क्रीनप्ले)

द फादर

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (ओरिजनल स्क्रीनप्ले)

प्रॉमिसिंग यंग वुमन

संबंधित बातम्या :

Oscar 2021 | मुख्य भूमिकेसाठी ऑस्कर नामांकन मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता, वाचा कोण आहे रिज अहमद?

(Oscars 2021 Nomadland wins Best Picture Chloe Zhao Best Director at 93rd Academy Awards)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.