Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saina Trailer | ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधत ‘सायना’चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित, पाहा हा ट्रेलर…

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या 'सायना' चित्रपटाचा ट्रेलर आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अप्रतिम असून, प्रेक्षकांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Saina Trailer | ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधत ‘सायना’चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित, पाहा हा ट्रेलर...
सायना बायोपिक
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 5:01 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या ‘सायना‘ चित्रपटाचा ट्रेलर आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अप्रतिम असून, प्रेक्षकांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परिणीतीचा चित्रपटातला उत्साह या जबरदस्त ट्रेलरमधून दिसून येत आहे. परिणीती चोप्राचा हा पहिलाच बायोपिक चित्रपट आहे (Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion).

ट्रेलरची सुरूवात, सायनाच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या मेघना मलिक यांच्या पासून होते. हरियाणवी अॅक्सेंटमध्ये संवाद बोलत, लहानग्या सायनाला बॅडमिंटन स्टार होण्याची स्वप्ने त्या दाखवत आहेत. ज्यामध्ये त्या अप्रतिम दिसत आहेत. यानंतर बॅडमिंटन स्टार बनण्यासाठी सायनाचा प्रवास आणि संघर्ष सुरू होतो. परिणीती चोप्रा बर्‍याच दृश्यांमध्ये सायना प्रमाणे चुलबुली दिसण्याऐवजी एकदम भोळी दिसली आहे.

चित्रपटाचा पूर्ण ट्रेलर येथे पहा

सायना एक आख्यायिका : परिणीती चोप्रा

सायनाची भूमिका साकारताना परिणीती म्हणाली, ‘सायना नेहवालसारख्या एखाद्या व्यक्तीला पडद्यावर व्यक्त करणे ही मोठी जबाबदारी आहे. ती एक आख्यायिका आहे आणि लोक काय प्रतिक्रिया देतील याबद्दल मला खूप भीती वाटली होती. परंतु, जगभरातून येणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल मी त्यांची आभारी आहे. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीमधील सुप्त भावनेचा उत्सव आहे.’

परिणीती हुशार अभिनेत्री : सायना नेहवाल

त्याच वेळी सायना म्हणाली, ‘चित्रपटातील प्रत्येक गोष्ट अगदी वास्तविक आहे. मी माझ्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे, ते फक्त माझ्या कुटुंबाच्या भक्कम सहकार्यामुळे शक्य झाले आहे. अशा मोठ्या खेळाचा भाग होणं, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, जी मला खूप आवडते आणि माझं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझ्या देशाला एका चांगल्या उंचीवर नेण्यासाठी योगदान देऊ शकले. परिणीती एक हुशार अभिनेत्री आहे. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला कळले नाही की, आम्ही दोघी कधी मैत्रिणी झालो. मी या चित्रपटासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा देते आणि सर्वांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशी मी आशा करते (Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion).

भारताच्या ‘फुलराणी’ची कथा

या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सायनाची कामगिरी आणि तिच्या संघर्षाची कहाणी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा टीझर शेअर करत परिणीतीने “सायनाचा टीझर, आता ट्रेलरही लवकरच!” असे कॅप्शन लिहिले होते. परिणीतीशिवाय बँडमिंटनपटू सायना नेहवालनेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर हा टीझर पोस्ट केला होता. तिच्या स्वत:च्या संघर्षांवर आधारित या सिनेमाचा तिला प्रचंड अभिमान वाटतो. हा तिच्यासाठी देखील एक भावनिक क्षण आहे. याचा उल्लेख त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला होता

श्रद्धा ऐवजी परिणीतीची वर्णी!

यापूर्वी अशी बातमी आली होती की, चित्रपट निर्माते अमोल गुप्ते दिग्दर्शित या बायोपिकसाठी सुरुवातील अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॅडमिंटन टीमचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे जवळपास दीड महिना प्रशिक्षण घेतले होते, जेणेकरुन ती सायनाच्या भूमिकेसाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करू शकेल. सप्टेंबर 2018मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, परंतु डेंग्यूमुळे श्रद्धाला शूटिंग मधेच थांबवावे लागले. यानंतर, जेव्हा श्रद्धा सावरली, तिचे वेळापत्रक खूप व्यस्त होते, ज्यामुळे ती या बायोपिकला वेळ देऊ शकली नाही(Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion)’

परिणीती चोप्रा चित्रपटांमध्ये व्यस्त!

गत वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘केसरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतला होता. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बहुमान मिळवला होता. ‘केसरी’ने पहिल्याच दिवशी 21.06 कोटी रुपयांची विक्रमी कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 21.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सध्या परिणीती चोप्रा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’च्या कामात व्यस्त आहे.

(Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion)

हेही वाचा :

Marathi Movie : गंभीर विषयावर गमतीशीर चित्रपट, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.