Raghav-Parineeti Wedding : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राचे फोटो आले समोर, पाहा सर्व फोटो
राजस्थानमधील तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये राघव आणि परिणीती यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. राघव चढ्ढा हे पाहुण्यांसोबत वरात घेऊन बोटीतून लीला पॅलेसमध्ये पोहोचले.
नवी दिल्ली : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर आज या दोघांचा विवाहसोहळा पार पडला आहे. राजस्थानमधील तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये राघव आणि परिणीती यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.
राघव चढ्ढा हे पाहुण्यांसोबत वरात घेऊन बोटीतून लीला पॅलेसमध्ये पोहोचले. तर आता राघव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये राघव हे कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी छत्रीचा वापर करताना दिसत आहेत.
तर राघव यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राघव हे लीला पॅलेसमध्ये जात असताना त्यांची बोट पूर्णपणे पडद्याने झाकण्यात आली होती. जेणेकरून त्यांचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होणार नाही.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा हे लग्न बंधनात अडकण्याअगोदर राघव यांचा पहिला फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राघव यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या फोटोमध्ये राघव पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहेत.
परिणीती चोप्राची बहीण प्रियांका चोप्रा तिच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. प्रियांकाने पोस्टद्वारे परिणीतीला तिच्या भावी आयुष्याच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तर राघव-परिणीती यांच्या विवाहसोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, हरभजन सिंग, गीता बसरा अशा अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे.