मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे लाईमलाईटमध्ये असते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा तूफान रंगताना दिसली की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई मलायका अरोरा ही होणार आहे. मात्र, त्यानंतर अर्जुन कपूर याने थेट सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कायमच एकसोबत दिसतात.
सध्या मलायका अरोरा हिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झालेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिचा यावेळी जबरदस्त असा बोल्ड लूक दिसत आहे. मलायका अरोरा हिला पाहून चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी एक दिव्यांग चाहता मलायका अरोरा हिच्याजवळ आला. यावेळी त्या दिव्यांग चाहत्यासोबत फोटो काढताना देखील मलायका अरोरा ही दिसली. मात्र, यादरम्यान असे काही घडले की, ते पाहून उपस्थित लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
पाहा व्हिडीओ-:
फोटो काढताना या चाहत्याने चक्क मलायका अरोरा हिच्या कंबरेवरच हात ठेवला. मलायका अरोरा हिच्या कंबरेवर हात ठेऊन खास पोझ देताना देखील हा चाहता दिसला. याप्रकारानंतर मलायका अरोरा हिचा पार चढेल असे अनेकांनी वाढले. मात्र, विशेष बाब म्हणजे या चाहत्याला काहीच बोलताना मलायका अरोरा ही अजिबात दिसली नाही.
आता याच प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मात्र, अनेकांना हा प्रकार अजिबातच आवडलेला दिसत नाहीये. लोक त्या चाहत्याला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. अनेकांनी त्या व्हिडीओनंतर संताप देखील व्यक्त केलाय. मलायका अरोरा हिचा तो व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.