विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट भाजपच्या धोरणांशी साधर्म्य असलेला प्रचारकी थाटाचा चित्रपट म्हणून एका वर्गाकडून टीका होत आहे. ज्या घटनेत काश्मिरी पंडितांनी आपली घरं गमावली, नातेवाईक गमावले त्यांच्याशी बोलून, संशोधन करून हा चित्रपट बनवण्यात आला आहे, असं विवेक अग्निहोत्रींनी स्पष्ट केलं. या चित्रपटाच्या बाजूने आणि त्याविरोधात असे दोन गट सध्या सोशल मीडियावर पडले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले आहेत. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून त्यांनी ट्विटरवर एक खोचक पोस्ट लिहिली आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा प्रचारकी थाटाचा चित्रपट आहे. तो जखमा भरतोय की द्वेषाची बिजं पेरतोय,’ असा सवाल करणारा एक व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये लिहिलंय, ‘प्रिय अभिनेते, जे आता निर्माते झाले आहेत.. तुम्ही या फाईलींनाही ट्विस्ट देऊन चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित करणार का?’ या ट्विटमध्ये त्यांनी ‘गोध्रा फाईल्स, दिल्ली फाईल्स, जीएसटी फाईल्स, नोटाबंदी फाईल्स, कोव्हिड फाईल्स, गंगा फाईल्स’, अशी नावं लिहिण्यात आली आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी विवेक अग्निहोत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
Dear supreme Actor turned Producer.. will you arm twist these files too .. and release them #justasking pic.twitter.com/IuiEslWidB
— Prakash Raj (@prakashraaj) March 19, 2022
काश्मीरला 370 कलमाअंतर्गत मिळालेला विशेषाधिकारच सर्व अत्याचारांच्या मुळाशी आहे. हे कलम हटवा आणि काश्मिरी पंडितांना पुन्हा त्यांच्या घरी येऊ द्या, अशी मागणी काश्मिरी पंडितांनी केली होती. इथपासून ते भाजप प्रणित सरकारने 370 कलम रद्द करण्यापर्यंतच्या घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाने सत्य जगासमोर आणल्याबद्दल त्यांचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे, ते सत्य कायम दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ज्यांना हा चित्रपट पटत नाही, योग्य वाटत नाही, त्यांनी दुसरा चित्रपट करावा. त्यांना कोणी अडवलंय, असं मोदी भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत केलेल्या भाषणादरम्यान म्हणाले होते.
हेही वाचा:
Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!