Preity Zinta | प्रीती झिंटाकडेही ‘गुडन्यूज’? अनुष्का-करीनाप्रमाणे ‘ब्लॅक पोलका डॉट’ ड्रेस परिधान केल्याने चाहते संभ्रमात!

हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. या दरम्यान हृतिकने टी-शर्ट आणि थ्री-फोर्थ पँट या अवतारात दिसला. तर, प्रीतीने पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. प्रीतीचा हा ड्रेस पाहून सोशल मीडियावर तिच्या प्रेगनन्सीची चर्चा रंगली आहे.

Preity Zinta | प्रीती झिंटाकडेही ‘गुडन्यूज’? अनुष्का-करीनाप्रमाणे ‘ब्लॅक पोलका डॉट’ ड्रेस परिधान केल्याने चाहते संभ्रमात!
प्रीती झिंटा
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 1:09 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) पती जीन गुडइनफ (Gene Goodenough)  याच्या समवेत लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे. पण, सध्या ती भारतात आहे. नुकतीच मंगळवारी प्रीती अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) याच्या घरी पोहोचली होती. हृतिकच्या घरातून बाहेर पडताना दोघांनाही स्पॉट केले गेले होते. या दरम्यान हृतिकने टी-शर्ट आणि थ्री-फोर्थ पँट या अवतारात दिसला. तर, प्रीतीने पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. प्रीतीचा हा ड्रेस पाहून सोशल मीडियावर तिच्या प्रेगनन्सीची चर्चा रंगली आहे (Preity Zinta wear black polka dot dress netizens ask for good news).

वास्तविक, अभिनेत्री अनुष्का शर्माने जेव्हा ‘गुडन्यूज’ची घोषणा केली, तेव्हा असाच पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. त्याचवेळी हर्दिका पंड्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकनेही गरोदरपणात पोलका डॉट ड्रेस परिधान केला होता. करीना कपूर-खानदेखील अशाच ड्रेसमध्ये दिसली होती. यानंतर या ड्रेसबद्दल बर्‍याच मीम्स बनवल्या गेल्या. आता प्रीतीचा हा ड्रेस पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर कमेंट करत विचारत आहेत की, प्रीती लवकरच गुडन्यूज देणार आहेस का? तर, कोणी म्हणतय की, हा ‘गुडन्यूज’वाल ड्रेस आहे!

तथापि, काही चाहते हृतिक आणि प्रीतीच्या या जोडीचे कौतुकही करत आहेत. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, या दोघांनी लवकरच ‘कोई मिल गया’चा दुसरा पार्ट बनवावा.

पाहा प्रीती झिंटाचा फोटो

 (Preity Zinta wear black polka dot dress netizens ask for good news)

बॉलिवूडपासून दूर जाताना केले मोठे विधान

प्रीती काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘मी बॉलिवूडपासून दूर आहे, कारण मी स्वत:ला विकू शकत नाही. मी त्या लोकांपैकी नाही, जे उभे राहून कशाबद्दलही तक्रार करतात. मला कोणाविषयी तक्रार नाही. जर मी मनोरंजन विश्वापासून दूर आहे, तर याचा अर्थ असा की मला स्वत:ला विकायचे नाही. चर्चेत येण्यासाठी फिल्मी जगात स्वत:साठी जागा खरेदी करताना तुम्हाला मी दिसणार नाही. मी माझ्या कामाबद्दल कौतुक मिळवू इच्छिते’.

प्रीती झिंटाने तिच्या करिअरची सुरूवात मणिरत्नम यांच्या ‘दिल से’या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर प्रीतीने ‘सोलजर’, ‘दिल चाहता है’, ‘कोई मिल गया’, ‘कल हो ना हो’, ‘वीर झारा’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ यासह अनेक हिट चित्रपट दिले.

प्रीती झिंटा हृतिकच्या सीरीजची निर्मिती करणार!

याशिवाय प्रीती तिचा मित्र हृतिक याच्या आगामी सीरीजची निर्मिती करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, ‘द नाईट मॅनेजर’ या कादंबरीवर आधारित सीरीज तयार केली जात आहे. कथेचे पात्र खूपच गुंतागुंतीचे होते, ज्यामुळे तिने हृतिकला याची विचारणा केली. हृतिकनेही या भूमिकेसाठी त्वरित सहमती दर्शविली. ‘नाईट मॅनेजर’ हा हृतिकचा ओटीटीवरील पहिला प्रोजेक्ट असेल आणि यासह प्रीतीदेखील पहिल्यांदाच ओटीटीवर सीरीज तयार करेल.

(Preity Zinta wear black polka dot dress netizens ask for good news)

हेही वाचा :

PHOTO | एक फोटो, तीन सुपरस्टार आणि मोठं राजकीय स्टेटमेंट, का बॉलिवूडला झापतायत नेटीझन्स?

Video | श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोरिला! पाहा अभिनेत्रीने पुढे काय केलं…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.