कपूर घराण्यात संपत्तीवरून वाद, राजीवच्या संपत्तीवर हक्क सांगतायत रणधीर-रीमा, कोर्ट म्हणतंय पुरावा द्या…

गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) या जगाला निरोप देऊन निघून गेले आणि अलीकडेच त्यांचे बंधू राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचेही 9 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे.

कपूर घराण्यात संपत्तीवरून वाद, राजीवच्या संपत्तीवर हक्क सांगतायत रणधीर-रीमा, कोर्ट म्हणतंय पुरावा द्या...
कपूर भावंडं
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 9:23 AM

मुंबई : कपूर घराण्यावर गेल्या काही महिन्यांत दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) या जगाला निरोप देऊन निघून गेले आणि अलीकडेच त्यांचे बंधू राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचेही 9 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ऋषी आणि राजीव यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर (Randhir Kapoor) अद्याप या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. कपूर घराण्याच्या या पिढीचे रणधीर कपूर आणि त्याचा बहिण रीमा जैन (Rima Jain) हे दोघेच हयात आहेत. दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी देखील झाली आहे (Property clashes in Kapoor family rima jain and randhir kapoor wants right on rajiv kapoor property).

राजीव कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. पत्नीशी मतभेद झाल्यामुळे ते दोघे वेगळे झाले होते. दोघांनाही सार्वजनिक ठिकाणी कधीच एकत्र पाहिले गेले नव्हते. रणधीर कपूर आणि रीमा जैन यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, आता ते दोघेच राजीव कपूर यांच्या मालमत्तेचे वारस आहेत. या सुनावणीत हायकोर्टाने या दोघांनाही राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचा पुरावा आणण्यास सांगितले आहे.

रणधीर आणि रीमा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सुनावणी केली. राजीव कपूर यांचे 2001मध्ये आरती सबरवालसोबत लग्न झाले होते आणि 2003 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. सुनावणीत रणधीर आणि रीमा यांचे वकील म्हणाले की, राजीव आणि आरती यांचे घटस्फोटपत्र त्यांच्याकडे नाही आणि कोणत्या कौटुंबिक कोर्टाने त्यांच्या घटस्फोटाचा आदेश जारी केला, हे देखील त्यांना माहिती नाही (Property clashes in Kapoor family rima jain and randhir kapoor wants right on rajiv kapoor property).

भावाच्या मालमत्तेवर केवळ आमचा अधिकार!

रणधीर कपूर आणि रीमा जैन यांचे वकील म्हणाले की, राजीव कपूरच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात. आमच्याकडे त्यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे नाहीत. आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु, ती सापडली नाही. त्यांना घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यापासून सूट देण्यात यावी. यावर न्यायाधीश गौतम म्हणाले की, घटस्फोटाच्या आदेशाची कागदपत्रे सादर न करण्यासाठी सूट देण्यास न्यायालय तयार आहे, परंतु स्वीकृतीपत्र आधी दिले जावे. या प्रकरणातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

कोण आहेत आरती सबरवाल?

आरती सबरवाल एक आर्किटेक्ट आहे. राजीवचे वडील राज कपूर या लग्नाला अनुकूल नव्हते. असे असूनही या दोघांचे लग्न झाले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोन वर्षानंतर दोघांचेही घटस्फोट झाले. आरती सध्या कॅनडामध्ये राहते.

(Property clashes in Kapoor family rima jain and randhir kapoor wants right on rajiv kapoor property)

हेही वाचा :

Indian Idol 12 | क्वारंटाईन असलेल्या पवनदीपच्या आठवणीत अरुणिता व्याकूळ, म्हणाली ‘जेव्हा तो सोबत नव्हता…’

कोरोनामुक्त झालेल्या निक्की तंबोलीचा मोठा निर्णय, कोरोना रूग्णांसाठी करणार ‘अशी’ मदत!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.