मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar ) यांचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांना बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुनीतच्या मृत्यूनंतर कर्नाटक राज्यात सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. ही बातमी कळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही पुनीतला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुनीत यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, ‘डॉ राजकुमार यांचा मुलगा पुनीत राजकुमार यांचा तरुण वयात झालेला मृत्यू हा धक्का बसण्यापेक्षा कमी नाही. मी वैयक्तिकरित्या एक जवळचा मित्र गमावला आहे. त्यांचा उत्साह, त्यांची प्रतिभा, त्यांचे अनेक उत्कृष्ट चित्रपट, कन्नडचे सांस्कृतिक दूत म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व मी विसरू शकत नाही’.
“ವರನಟ ಡಾ.ರಾಜಕುಮಾರ್ ಸುಪುತ್ರ ಪುನೀತ್ ರಾಜಕುಮಾರ್ ಅಕಾಲಿಕ ನಿಧನ ಹೊಂದಿರುವುದು ಅತೀವ ಆಘಾತವನ್ನುಂಟು ಮಾಡಿದೆ. ಕಿರಿಯ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೇ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ ರಾಷ್ಟ್ರಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತ ಜನಪ್ರಿಯ ಮೇರು ನಟ, ಯುವಜನತೆಯ ಕಣ್ಮಣಿ, ಯೂಥ್ ಐಕಾನ್ ಆಗಿದ್ದ ಪುನೀತ್ ನಿಧನ ಹೊಂದಿರುವುದು ಕಲಾರಂಗಕ್ಕೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ನಷ್ಟ, ವಿಧಿಯ ಕ್ರೂರ ಆಟ”(1/3)
— CM of Karnataka (@CMofKarnataka) October 29, 2021
आर माधवन यांनी शोक व्यक्त करताना लिहिले की, ‘सर्वात दयाळू, प्रेमळ आणि उदात्त आत्म्यांपैकी एक गेला. मला खूप धक्का बसला आहे, भाऊ, आमची मनं मोडून आणि गोंधळात टाकून तुम्ही आम्हा सर्वांना सोडून गेलात. आज स्वर्ग उजळून निघाला आहे. मला अजूनही असं वाटत आहे की, हे खरे नाही.’
GONE- one of our KINDEST, NICEST AND NOBLE soul. I don’ know what I am feeling . I am feeling so devastated. Brother you have left us very confused and heartbroken. The heavens are brighter today. I am still hoping this is not true . ???????? pic.twitter.com/7wjXZzk0ND
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) October 29, 2021
अभिनेता सिद्धार्थने लिहिले की, ‘पुनीत, तू आम्हाला सोडून गेला आहेस यावर माझा विश्वास बसत नाहीय. दयाळू, प्रतिभावान, निर्भय… तू या जगाला खूप काही दिलेस. हे ठीक नाही झालं भावा.’
क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, पुनीत राजकुमारच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. किती उदार आणि सभ्य व्यक्तीमत्त्व, त्यांचे जाणे भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
Saddened to hear about the passing away of #PuneethRajkumar . Warm , and humble, his passing away is a great blow to Indian cinema. May his soul attain sadgati. Om Shanti. pic.twitter.com/YywkotiWqC
— Virender Sehwag (@virendersehwag) October 29, 2021
अभिनेता पुनीत राजकुमार हा 46 वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1985 मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला होता. याच चित्रपटासाठी त्याची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित झाला होता.
Sidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याचा प्रचंड धक्का; शहनाजला दु:ख आवरेना