Raj Kundra Case | अश्लिल चित्रपटप्रकरणात राज कुंद्रांना एका खटल्यात दिलासा, मात्र तूर्तास सुटका नाहीच!

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020मध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणात राज कुंद्राला (Raj Kundra) अटकेपासून अंतरिम संरक्षण दिला आहे. राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला की, एफआयआरमधील सहआरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत.

Raj Kundra Case | अश्लिल चित्रपटप्रकरणात राज कुंद्रांना एका खटल्यात दिलासा, मात्र तूर्तास सुटका नाहीच!
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 1:22 PM

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020मध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणात राज कुंद्राला (Raj Kundra) अटकेपासून अंतरिम संरक्षण दिला आहे. राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला की, एफआयआरमधील सहआरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, राज कुंद्रावर लावण्यात आलेले गुन्हे हे सर्व 7 वर्षांपेक्षा कमी कारावासासह दंडनीय आहेत आणि म्हणून या जामीन अर्जाला परवानगी दिली पाहिजे.

मात्र या याचिकेला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपीची भूमिका या प्रकरणातील इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. जस्टिस संदीप के. शिंदे यांनी कुंद्राला अटक होण्यापासून संरक्षण देणारा अंतरिम आदेश 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत निर्देशित केला आहे.

पूर्ण दिलासा नाहीच!

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर नग्न कामुक सामग्री प्रसारित करण्याच्या संदर्भात  नोंदवलेल्या ऑक्टोबर 2020च्या एफआयआरमध्ये कुंद्राने अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. राज कुंद्रावर भादवि कलम 292, 293 (अश्लील सामग्रीची विक्री), माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम 66 ई, 67, 67 ए (लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रसारित करणे) आणि महिलांचे असभ्य प्रतिनिधीत्वाच्या तरतुदी (प्रतिबंध) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

मात्र, राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने दाखल केलेल्या 2021 च्या एफआयआरमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, राज कुंद्राला सायबर सेलमध्ये दाखल प्रकरणात\ही अटक केली जाणार अशी भीती होती. सध्या राज कुंद्रा गुन्हे शाखेने दाखल केलेल्या अश्लील चित्रपट प्रकरणात अटकेत आहेत.

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

हेही वाचा :

Raj Kundra Controversy : बिटकॉईन घोटाळ्यापासून ते आयपीएल मॅच फिक्सिंगपर्यंत, राज कुंद्राभोवती नेहमीच वादाचं वलय!

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात 

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.